आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पीसीओएस आजार कोणत्याही महिलेला त्रास होऊ शकतो. महिलांच्या बीजकोषात दर महिन्याला एका ग्रंथीची निर्मिती होते. ही ग्रंथी महिन्याच्या मध्यावर फुटून त्यामधून बीजांड बाहेर येते. पीसीओएसमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे ही ग्रंथी फुटतच नाही, यामुळे बीजांड बाहेर येत नाही. तसेच अंडाशयात अशा अनेक ग्रंथींची निर्मिती होतच राहते. म्हणून याला पीसीओएस म्हणतात.
ही आहेत लक्षणे
१ बद्धकोष्ठता
२ मानेची, काखेची, मांड्यांची त्वचा काळी पडणे
३ केस गळणे
४ डिप्रेशन येणे
५ गर्भ न राहणे
६ इन्सुलिनच्या कार्यात अडथळा येणे, रक्तातील साखर वाढणे, इत्यादी
७ अनियमित पाळी, पाळीच्या वेळी अनियमित रक्तस्त्राव
८ वजन वाढणं, विशेष करुन ओटी पोटाभोवती जाडी अधिक वाढणे
९ चेहऱ्यावर, ओठांच्या वर , हनुवटीवर केस उगवणे
१० हातापायावर नेहमीपेक्षा अधिक केस उगवणे
११ चेहऱ्यावर पिम्पल्स येणे
१२ सतत मूड बदलणे, चिडचिड होणे, सारखे रडू येणे
असा घ्या आहार
१ अती गोड, दुधाचे आणि मैद्याचे पदार्थ टाळा.
२ शीतपेये पूर्णपणे बंद करावीत
३ रोज सकाळी गरम पाणी प्यावे
४ पोट साफ राहिल याकडे लक्ष ठेवावे.
Visit : arogyanama.com