आरोग्यनामा ऑनलाइन – मुली आणि महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे पोलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओसी) ची समस्या सुरू होते. पीसीओसी जास्त काळ राहिल्यास इनफर्टिलिटीची समस्या वाढू शकते. ही समस्या १० पैकी १ महिलेला होते. हा मुली किंवा महिलांना होणारा आजार असून यात अॅस्टड्ढोजन आणि प्रोगसेसटोरॉन नावाच्या सेक्स हॉर्मोनची लेव्हल बिघडून जाते. यामुळे ओव्हरीत सिस्ट (गाठ) बनते. हा आजार जेनेटिक असू शकतो, किंवा लठ्ठपणा आणि अनहेल्दी डायट किंवा डायबिटीजमुळे होतो.
सलग वजन वाढणे, चेहऱ्यावर फोड येणे, अनियमित मासिक पाळी आणि अनलिमीटेड ब्लिडींग, केस गळण्याची समस्या, आवाज घोगरा होणे, डोकेदुखी, स्किन समस्या, वंध्यत्व ही या आजाराची लक्षणे आहेत. यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास लगेच तुम्ही डॉक्टरकडे गेले पाहिजे. यासोबतच खाण्यापिण्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी महिलांनी नियमित १० ते १५ मिनीटे व्यायाम करावा. डायटमध्ये फ्रूट्स, हिरव्या पाले भाज्या, नट्स, बीन्स आणि कडधान्य खावे. मांस, चीज आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत. स्मोकिंग आणि ड्रिंक करू नये. सलग एकाच जागेवर बसून न राहता अधून मधून जरा फिरावे.