आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Parenting | मुले सर्वात जास्त वेळ घरात आपल्या पालकांसोबत राहतात आणि त्यांच्याकडूनच अनेक गोष्टी शिकतात. चांगले असो की वाईट, आई-वडिल त्यांच्यासाठी (Parenting) प्रत्येक गोष्टीचे उदारहण असतात. पालक मुलांना योग्य गोष्टी शिकवण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवतात. परंतु नकळत ते मुलांना काही वाईट गोष्टीसुद्धा शिकवतात, ज्यांचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा मुलांवर मानसिकदृष्ट्या खोलवर परिणाम होतो, त्या जाणून घेवूयात…
1. वाद घालणे (Arguments) –
जर तुमचे मुल दररोज तुम्हाला वाद घालताना किंवा घरात सतत भांडण-हाणामारी करताना पहात असेल तर त्याचे वागणे आपोआपच हिंसक होत जाईल. घरात होणारी भांडणे पाहून मुले कुठे ना कुठे स्वतालाही दोषी समजू लागतात. जर पालक आपसात एखाद्या गोष्टीवरून वाद घालत असतील तर हा वाद चांगल्याप्रकारे मुलांसमोर सोडवण्याचा प्रयत्न करा. यातून मुलांना शिकवण मिळते की, भांडण कोणत्याही टोकाला न जाता चर्चेने आणि शांततेने सोडवता येऊ शकते.
2. मारहाण करणे (Violence) –
घरात होणारी कोणत्याही प्रकारची हिंसा मुलांचे जीवन नेहमीसाठी बिघडवून टाकू शकते. अपमानजनक असो की, शारीरीक कोणत्याही प्रकारची हिंसा मोठे होत असलेल्या मुलावंर मानसिकदृष्ट्या खोलवर परिणाम करते. मुले वाईट वागणे सर्वप्रथम आपल्या पालकांकडूनच शिकतात. अशी मुले मोठी झाल्यानंतर ड्रग्ज किंवा अल्कोहोलसारख्या व्यसनाला बळी पडण्याची जास्त शक्यता असते.
3. कडक शिस्त (Hard Disciplining) –
आई-वडील आपल्या मुलांना कशाप्रकारे शिस्त शिकवतात, हे सुद्धा मुलांच्या वागण्याला खुप प्रभावित करते. जेव्हा पालक मुलावर जबरदस्तीने एखाद्या गोष्टीचा दबाव आणतात तेव्हा मुलाच्या वागण्यात बदल होऊ लागतो आणि ते हळुहळु आपल्या पालकांपासून दूर होऊ लागते. कडक शिस्तीत मुले नेहमी आक्रमक होतात आणि त्यांच्या मनावर याचा नकारात्मक परिणाम होतो.
–
4. अँटी-सोशल होणे (Being Anti-Social) –
शिकागो युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार, जर तुम्ही समाजापासून दूर राहणारे म्हणजे अँटी सोशल आई-वडील असाल तर या गोष्टीची खुप जास्त शक्यता असते की, तुमची मुले, ही वाईट सवय तुमच्याकडून शिकू शकतात आणि संपूर्ण जीवन असेच घालवू शकतात. मुले पालकांच्याच सवयी अवलंबतात आणि त्यांच्या अँटी-सोशल होण्याचा परिणाम सुद्धा मुलांवर तसाच होतो. यातून मुलांचे सोशल स्कील खराब होते आणि ती कुणासोबत मिळून-मिसळून राहात नाहीत.
5. तणाव किंवा दबाव सांभाळू न शकणे (Not Handling Stress Well) –
कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा मानसिक दबावाला पालक कसे तोंड देतात, हे मुले पालकांकडूनच हुबेहुबे शिकतात.
जर तुम्ही खुप लवकर अस्वस्त होत असाल आणि सतत तणावात राहात असाल तर तुमचे मुलं सुद्धा कोणत्याही प्रकारचा दबाव सांभाळू शकणार नाही.
अशा स्थितीत ते तसेच वागू शकते जसे ते तुम्हाला पहात असते.
संतापून ओरडणे, वाईट-साईट बोलणे आणि वस्तू फेकणे किंवा तोडणे या सारख्या गोष्टी मुले पालकांकडूनच शिकतात. (Parenting)
मुले जरी मोठी झाली तरी पालक त्यांच्यासाठी परफेक्ट रोल मॉडल असतात.
पालकांनी यासाठी मुलांसमोर चांगल्याप्रकारे राहिले पाहिजे.
तुमच्या काही चुकीच्या सवयी मुलांचे जीवन कायमसाठी खराब करू शकतात.
आपल्या मुलांना चांगल्या सवयी द्या आणि चांगले पालक बनण्याचा प्रयत्न करा. (Parenting)
Web Title :- Parenting | parenting mistakes negative things kids learn from their parents
Health Tips | आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत ‘हे’ 5 प्रकारचे चहा; जाणून घ्या फायदे
Men’s Health | पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये या 5 लक्षणांकडे, आरोग्यासाठी धोका, जाणून घ्या