लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : ताप आल्यास लहान मुलांना पॅरासिटामॉल हे औषध जवळपास सर्वच पालक देतात. शिवाय हे औषध सुरक्षित देखील मानले जाते. मात्र, मुलांना पॅरासिटामॉल देताना काही काळजी घेतली पाहिजे. सावधगिरी बाळगली नाही किंवा याचा जास्त डोस दिला तर त्याचा वाईट परिणाम लहान मुलांवर दिसून येऊ शकतो.
बाळाचे वय ३ महिन्यांपेक्षा कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याला पॅरासिटामॉल देऊ नका. बाळाच्या शरीराचे तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा कमी असेल तर पॅरासिटामॉल देणे टाळावे. बाळाला आधीच दुसरे एखादे औषध देत असाल तर पॅरासिटामॉलचा डोस देऊ नका. बाळाला लिव्हरसंबंधी एखादा आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पॅरासिटामॉल द्यावे. ४-५ तासांच्या आत दोनदा पॅरासिटामॉलचा डोस देऊ नये.
पॅरासिटामॉल दिल्यानंतरही बाळाची तब्येत चांगली झाली नाही तर डॉक्टरांकडे जावे,पॅरासिटामॉल दिल्यानंतर बाळाला उलटी होत असेल तर ते देऊ नका, तुम्ही आजारपणात मुलांना पॅरासिटामॉल देत असाल तर हे १० एमजीच्या हिशोबाने द्यावे. मुलाचे वजन १० किलो असेल तर त्याला १०० एमजी पॅरासिटामॉल द्यावे, ही काळजी बाळाला पॅरासिटामॉल देताना घेतली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मुलांना या औषधाचा जास्त अथवा लागोपाठ डोस देऊ नका. काही चूक झाली तर यामुळे मुलांना त्रास होऊ शकतो. डॉक्टरांनी दिलेले सूचनांचे पालन करूनच पॅरासिटामॉल दिले पाहिजे.