आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पपई हे फळ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पपईतील पपाइन या अँटीऑक्सीडेंट्समुळे आरोग्य समस्या दूर राहतात. पपईच्या रसामध्ये लिंबूचा रस मिसळून सेवन केल्यास याचे आरोग्य फायदे आणखी वाढतात. यामुळे कोणते फायदे होतात, हे जाणून घेवूयात.
हे आहेत ७ फायदे
१) यातील व्हिटॅमिन सी मुळे एनर्जी मिळते आणि कमजोरी दूर होते.
२) यातील अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांध्यातील दुखणे दूर होते.
३) यताील पपाइनमुळे मासिक पाळी नियमित होते. पाळीतील वेदनांपासून बचाव होतो.
४) यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव होतो.
५) पपईमधील अँटीऑक्सीडेंट्समुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते. हृदयविकारापासून बचाव होतो.
६) शरीराचे टॉक्सिन्स दूर होते. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
७) गॅस आणि बध्दकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर होतात.