आरोग्यानामा ऑनलाइन टीम : पिकलेली पपई सर्वांनाच आवडते. पपई या फळात अनक औषधी गुणधर्म असल्याने पपई अनेकजण आवर्जून खातात. मात्र, कच्ची पपई खाणे टाळले जाते. परंतु, कच्ची पपई खाणे आरोग्यासाठी खूपच चांगले आहे. यकृतासाठी कच्ची पपई लाभदायी आहे. कावीळीमुळे यकृतावर परिणाम होतो. यासाठी कच्ची पपई खाणे फायद्याचे आहे.
शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी पपईचा उपयोग होऊ शकतो. दर वेळी व्हॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करता येतो. शिवाय यामुळे कोणतीही दुखापत, साईड इफेक्ट होत नाहीत. कच्च्या पपईत असणारे पपीन नावाचे एंझाइम हे शक्तिवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.
कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात अ, ई आणि क जीवनसत्त्व असते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सर्दी, पडसे आणि मूत्रसंबंधी आजारांवर पपई गुणकारी आहे. यामुळे अधूनमधून पपईचे सेवन केले पाहिजे.पपईचे सेवन नियमित केल्यास आरोग्य उत्तम राहू शकते.