आरोग्यनामा ऑनलाईन- पुरुषांना अनेकदा प्रायव्हेट पार्टमध्ये म्हणजेच लिंगात वेदनेची( pain in the private part) समस्या होते. हे एखादा आजार, जखम किंवा संसर्गामुळे झालेल्या दुखापतीमुळे होते. जर लघवी करताना किंवा वीर्यस्खलनावेळी वेदना होत असेल, तर ही एक गंभीर समस्या आहे, जिच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मात्र, वेदना( pain in the private part) होत असल्यास काही घरगुती उपायांनीसुद्धा आराम पडू शकतो. असे काही घरगुती उपाय जाणून घेऊयात.
प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होण्याचे कारण
जर पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल. जसे की बॅलानायटिस, लैंगिक संसर्गाचे रोग, मूत्रमार्गातील संसर्ग, जखम किंवा कोणत्याही प्रकारचा गंभीर आजार जसे की कॅन्सरमुळेसुद्धा प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होऊ शकते.
वेदना दूर करण्याचे उपाय
1 प्रायव्हेट पार्टला शेक दिल्यास वेदना दूर होऊ शकते. यासाठी स्वच्छ टॉवेलमध्ये बर्फाचे तुकटे टाकून प्रायव्हेट पार्टला शेक द्या. वेदना आणि सूज असल्यास व्हिटॅमिन ईयुक्त क्रिम लावल्यानेसुद्धा फायदा होऊ शकतो.
2 प्रायव्हेट पार्टमध्ये वेदनेची समस्या असल्यास टाइट अंडरवेअर आणि कपडे घालू नका. सैल कपडे घातल्याने आतमध्ये घाम येत नाही, ज्यामुळे बॅक्टेरियांचा धोका राहात नाही. जोपर्यंत वेदना नष्ट होत नाही, तोपर्यंत सेक्स करणे टाळा.
3 लिंगातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी नॉनस्टेरॉयडल अँटी-इन्फ्लामेटरी ड्रग्ज जसे की इबूप्रोफेन घेऊ शकता. जर कोणत्या कारणामुळे वेदना होत असतील तर लिंगावर दही किंवा सफरचंदचे व्हिनेगर लावल्याने आराम मिळू शकते.
असा करा बचाव
लिंगाची नियमित स्वच्छता ठेवा. सेक्स करताना कंडोमचा वापर करा. संसर्ग असलेल्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवू नका. सेक्स करतातना लिंगावर दुमडणे किंवा त्यावर जास्त जोर पडण्याच्या पोझिशनपासून दूर राहा. काही समस्या असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.