किती लिटर पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खरंतर दिवसभरात भरपूर पाणी प्यावे असे सल्ले आपल्याला खूप दिले जातात. पण नेमके पाणी किती प्यावे हे आपल्याला सहसा कोणी सांगत नसते. परंतु आपल्या शारीरिक गरजा, वजन आणि ऋतुमानानुसार बदलणारे वातावरण यांचा व्यवस्थित अंदाज घेऊन पाणी पिणे गरजेचे असते. एका वैज्ञानिक इन्स्टिटयूट ने सांगितले आहे कि, पूरूषांनी ३.७ लिटर तर महिलांनी २.७ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ७० किलो वजन असेल तर दररोज ३ते४ ग्लास पाणी प्यावे. तसेच कमी वेळेत खूप जास्त पाणी प्यायल्याने हायप्रोटोमिया होतो. स्वस्थ शरीरासाठी गरजेपुरते पाणी प्यावे नाहीतर शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.

जास्त पाणी प्यायल्याचे ही आहेत लक्षणे : 
१) मळमळ आणि उलटी होणे
२) डोकेदुखी
३) जडपणा

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतात हे घातक परिणाम :
१) मांसपेशी कमजोर होणे
२) रक्तदाब
३) श्वास घेणास त्रास
४) बेशुद्धी
५) कोमा