आरोग्यनामा ऑनलाईन- सध्या सर्वच वयोगटात मधुमेहाचे(oral) प्रमाण वाढले आहे. बदललेली जीवनशैली हे हा आजार होण्याचे मुख्य कारण आहे. हा आजार झाल्यानंतर ओरल हेल्थकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. डायबिटिीसकडे दुर्लक्ष करणे तोंडाच्या(oral) समस्यांसाठी कारणीभूत ठरते. डायबिटीस नियंत्रणात नसेल तर तोंडाच्या समस्या वाढतात. व्हाईट ब्लड सेल्स कमी होतात. यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शन वाढू शकते.
होऊ शकतात या समस्या
1 रिसर्चनुसार डायबिटीसमुळे शरीराला तोंडाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
2 वाढलेल्या डायबिटीसमुळे लाळेचं प्रमाण कमी झाल्याने तोंडात कोरडेपणा जाणवतो. परिणामी अल्सर, दातांच्या समस्या उद्भवू शकतात.
3 हिरड्यांना सुज येण्याची, जीभेवर जळजळ होऊ शकते.
4 डायबिटीस असताना धुम्रपान केल्याने पोरिओडॉन्टल आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे हिरड्यांमध्ये रोग निर्माण होऊ शकतात.
हे लक्षात ठेवा
1 डायबिटीसमुळे तोंडांची समस्या उद्भवल्यास काळजी घ्या.
2 दात आणि हिरड्यांची डेंटिस्टकडून तपासणी करून घ्या.
3 काहीही खाल्यानंतर दात घासा.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.