पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोणताही आजार झाला तरी त्यावर आता उपचार उपलब्ध आहेत. फक्त डॉक्टरांना त्या रोगाचं योग्य निदान करता यायला हवं. परंतु, कोणत्याही रोगाचं योग्य निदान होण्यासाठी संबंधित डॉक्टर हा त्या आजारावरील तज्न असायला हवा. आणि आपल्याला तर कोणताही आजार बरा करायचा असेल तर डॉक्टरांवर विश्वास ठेवावा लागतो. परंतु सध्या अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचे ऐकण्यास भेटते.
मोठमोठया रुग्णालयात रुग्णांकडून पैशाची लूट केली जाते. त्यामुळे त्यांना कोणाकडे तक्रार करावी तेच कळत नाही. आणि त्यांच्या तक्रारीकडे कोणी लक्षही देत नाही. त्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने रुग्णाच्या सेवेसाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. अशी माहिती राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही रुग्णाला लुबाडले गेले तर त्याला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार करता येणार आहे. सरकारच्या या सुविधेमुळे रुग्णांना न्याय मिळणार आहे. आणि पूर्वी अनेक लोकांची कामे रखडत असत.
परंतु, आता या सुविधेमुळे कोणाचीही कामे रखडणार नाहीत. रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी परिषदेने ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा बुधवारपासून सुरू केली आहे. परिषदेच्या संकेतस्थळावरच ही सुविधा उपलब्ध असून यासाठी रूग्ण किंवा डॉक्टरांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.आता या सुविधेमुळे तक्रारीचा पाठपुरावा करणे रूग्ण आणि डॉक्टरांनाही सहज शक्य होईल. या निर्णयामुळे रुग्णांच्या तक्रारींचे निवारण लवकरात करता येईल. ही तक्रार राज्यातून कुठूनही करता येणार आहे.