पुणे : आरोग्य नामा ऑनलाईन – चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमीच विविध प्रकारचे उपाय करत असतो. सौंदर्यप्रसाधनांचा वापर यासाठी केला जातो. बहुतांश महिला नियमितपणे ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. तसेच नितळ, गोरी व सुंदर त्वचेसाठीही प्रत्येकजण काळजी घेताना दिसतो. मात्र, हातांच्या तळव्यांची विशेष काळजी घेतली जात नाही. खरं तर हाताचे तळवे सुद्धा सौंदर्याचाच एक भाग आहे.
हातांचे तळवे मुलायम असले पाहिजेत. यासाठी आपण काही घरगुती उपाय करून हातांचे तळवे मुलायम ठेऊ शकतो.
हातांच्या तळव्यांची काळजी घेताना केमिकलयुक्त उत्पादनांशी हाताचा थेट संबंध येऊ देऊ नका. तसेच ग्लोव्हजचा वापर आठवणीने करा. हात धुतल्यानंतर हँड लोशन लावा जेणेकरून तुमचे हात कोरडे पडणार नाहीत किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. ओले हात सुकवण्यासाठी हँड ड्रायरचा वापर टाळा. किचन पेपर किंवा टॉवेलनं हात पुसा.
टोमॅटो आणि लिंबात सौम्य असिड असतं. त्यामुळे टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित खरखरीत तळहातांसाठी खूप फायदेशीर ठरतं. दोन्ही रस समप्रमाणात घेऊन हातावर चोळा आणि १५ ते २० मिनिटांनी धुवा. यामुळे हाताचा काळसरपणाही दूर होईल. ओट्समिल आणि अपल सिडर व्हिनेगर एकत्र करून ते हातावर हळुवारपणे चोळावं. जर तुमच्या अपल सिडर व्हिनेगर नसेल तर व्हाइट व्हिनेगरही वापरू शकता.
ब्राऊन शुगर आणि ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात घ्या. एकत्र करून ते दोन्ही हातांच्या तळव्यावर चोळा. काही वेळानं हात धुवून टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा असं केल्यानं चांगला परिणाम दिसून येईल. दही हे आपल्या पोटासाठी जितकं फायदेशीर आहे, तितकंच हातासाठीही आहे. खरखरीत तळहातांवर दररोज दही चोळा. १५ ते २० मिनिटांनी धुवा. तुम्हाला लगेचच थोडासा फरक पडलेला दिसेल. लिंबूच्या रसात मीठ मिसळून ते तळहातावर चोळा. मिठामुळे त्वचेवरील मृत पेशी दूर होतात तर लिंबाच्या रसामुळे त्वचा मुलायम होते.