आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहरा तेलकट अनेक कारणांमुळे होतो. तेलकट चेहऱ्यावर धूळ, माती चिकटल्याने त्वचेवर त्याचा परिणाम होतो. तेलकट चेहरा असल्याने चेहऱ्यावर मुरुमही होतात. जाणून घेऊ चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्याचे उपाय
मसूर डाळ
मसूर डाळ हे त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा डाग, मुरूम दूर होण्यात मदत होते. अर्धा कप मसूर डाळ रात्रभर भिजत घालावी. सकाळी भिजलेली मसूर डाळ थोडेसे दूध टाकून वाटून घ्या. याची चांगली पेस्ट तयार झाल्यावर चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून एकदा लावा.
गुलाबजल
नियमितपणे कापसाचा गोळा गुलाबजलमध्ये भिजवून त्याने सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.
लिंबू
लिंबू देखील चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. लिंबमध्ये व्हीटॅमिन सी मुबलक असते त्यामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्र दूर होण्यास आणि त्यांचे अकुंचन होण्यास उपयोगी ठरते. यासाठी अर्धे लिंबू घेऊन त्याने चेहऱ्यावर चोळावे आणि २० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होतो.
कडुनिंब
कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल तत्व असल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करण्यात मदत होते. कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून बारीक पेस्ट तयार करून घ्या. आता या पेस्ट मध्ये हळद टाकून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट चेहऱ्याला लावा. चेहऱ्यावरील पॅक वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा, डाग , मुरूम दूर होण्यास मदत होते.
मुलतानी माती
चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती, २ ते ३ थेंब लिंबूरस आणि एक चमचा दही यांचा चांगला मिश्रण तयार करुन घ्या. आता चेहरा स्वच्छ धुवून हे मिश्रण चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून ३ वेळा हा पॅक चेहऱ्याला लावा.