महिलांनो, असे करा वॅक्सिंग, वेदना होतील कमी, स्कीन होईल मुलायम

महिलांनो, असे करा वॅक्सिंग, वेदना होतील कमी, स्कीन होईल मुलायम

आरोग्यनामा ऑनलाइन – महिला जेव्हा पार्लरमध्ये हॉट वॅक्सने शरीरावरील अनावश्यक केस काढतात, तेव्हा त्यांना खूप वेदना सहन कराव्या लागतात. परंतु, केवळ शरीराच्या सौंदर्यासाठी हे सहन केले जाते. मात्र, काही उपाय केले तर वॅक्सिंग करतानाच्या या वेदना कमी करता येऊ शकतात. यासाठी काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत.

योग्य कपडे
वॅक्सिंग नंतर फिटेड आणि स्किन-टाइट कपडे घालू नका. मोकळे आणि लूज कपडे घाला. त्वचेला ऑक्सिजन मिळू द्या.

वर्कआउट
एक्सरसाइज केल्याने जास्त घाम निघतो, ज्यामुळे मुलायम आणि सेंसटिव स्किनवर बॅक्टेरीया लवकर पसरतात. काही वेळासाठी वर्कआउट करू नका.

एक्सफोलिएट
एक प्यूमिस स्टोन घेवून बॉडीला स्क्रब करा. बॉडी स्क्रबरचा वापर देखील करु शकता. एक्सफोलिएशन केसांना सहज निघण्यास मदत करेल. परंतु कधीही वॅक्सिंगनंतर एक्सफोलिएट करु नका. यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

उन्हापासून दूर रहा
वॅक्सिंग आधी आणि नंतर स्किन झाकून ठेवा. सनबर्न स्किनवर वॅस्किंग केल्याने जास्त वेदना होतात आणि खाज येण्याची समस्या होते. यामुळे हे करण्याअगोदर आणि नंतर सनस्क्रीन लावणे विसरु नका.

बर्फ लावू नका
वॅक्सिंग करण्याअगोदर वॅक्सिंग करण्याच्या ठिकाणी बर्फ लावू नका. यामुळे पोर्स बंद होतात. यामुळे वॅक्सिंग करताना जास्त त्रास होतो.

वेळ पाहा
पीरियड्सच्या आगोदर किंवा त्या काळात बॉडी खुप सेंसटिव होते. या काळात वॅक्सिंग करु नका.

हॉट वॉटर
वॅक्सिंगनंतर स्किन खुप सेंसिटिव होते आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे हॉट शॉवर घेवू नका. स्किनला ऑक्सिजन मिळू द्या कारण यामुळे स्किन लवकर रिकव्हर होईल.

मॉश्चराइज करा
वॅक्सिंगमुळे डेड स्किन आणि अनावश्यक केस निघून जातात. परंतु त्वचेला खुप वेदना होतात. वॅक्सिंग करण्याआगोदर एसपीएफ जीझेड ब्लॉक क्रीम लावा. स्किन सेंसिटटीव्ह असेल तर एलोवेरा जेल लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु