पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा आला म्हणजे लगेच अनेक आजार सुरु होतात. तर त्यात  महिलांना सगळ्यात जास्त अशा समस्यांना समोर जावं लागत ते म्हणजे केस गळती. पावसाळ्यात वातावरणामध्ये ओलावा असतो आणि याच ओलाव्याचा परिणाम केसांवर होतो. यामुळे केस गळती आणि केसात कोंड्याचा त्रास सुरु होतो. अशा समस्या दूर करण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती हेअर मास्क

कडुलिंब आणि कोरफडचा हेअर मास्क 
यासाठी आधी कोरफड ३०मिनिट पाण्यामध्ये  भिजत ठेवा. त्यानंतर त्यातील गर काढून घ्या. आता कडुलिंबाच्या पानांचा चांगला पेस्ट तयार करा या पेस्ट मध्ये कोरफडचा गर नीट मिक्स करा. आता हा पेस्ट केसांच्या मुळांपासून ते संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर माइल्ड शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा. यामुळे केसांची आरोग्य राखण्यास मदत होते आणि केसांचा चिकटपणा पण कमी होतो.

image.png

दही आणि खोबऱ्याचा तेल 
केसांची चमक वाढवण्यासाठी आणि केसांतील कोंडा दूर करण्यासाठी या मास्कचा फायदा होतो. यासाठी अर्धा कप दह्यामध्ये पाच चमचे खोबऱ्याचे तेल एकत्रित करा. आता या मिश्रणात लिंबाचा रस एकत्र करा. तयार मिश्रण केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासांनी केस स्वच्छ धुवून घ्या.

image.png

केळी आणि अवोकाडो
या मास्क साठी केळीची साल काढून त्यात अवोकाडो एकत्रित करून पेस्ट तयार करून घ्या. आता या तयार  पेस्ट मध्ये दोन चमचे मध मिस्क करून घ्या.  तयार पेस्ट केसांना मुळापासून लावा. या मास्क मुळे  केस गळतीची समस्या कमी होते. आणि केस मजबुतीसाठीही फायदेशीर असते.

image.png

कडुलिंब आणि आवळा 
यासाठी आधी पाण्यात आवळा उकळून  पेस्ट तयार करून घ्या. यामध्ये कडुलिंबाचा पेस्ट हि मिक्स करा. आत हे मिश्रण केसांना लावून घ्या आणि २० ते ३० मिनिटांनी केस नीट धुवून घ्या. हा मास्क केसांची चमक वाढविण्यासोबतच त्यांच्या मजबुतीसाठीही फायदेशीर ठरतो.

image.png

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु