त्वचाविकारांत होतेय वाढ, नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ८ गोष्टी

त्वचाविकारांत होतेय वाढ, नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ८ गोष्टी

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  सध्या त्वचाविकाराचे रुग्ण वाढले आहेत. यात वांग येणे, फंगल इन्फेक्शन तसेच औषधे आणि स्टिरॉइड्स घेऊन त्वचेवर गंभीर परिणाम झालेल्या रुग्णांचीही संख्या जास्त आहे. पूर्वी त्वचाविकारावर सहा आठवड्यात नियंत्रण मिळत होते. पण आता त्यासाठी अनेक महिने लागत आहेत. गजकर्ण किंवा अन्य त्वचारोग पूर्वी साध्या पारंपरिक त्वचेच्या औषधांनी बरे होत होते. परंतु, आताचे त्वचारोग पारंपरिक औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे जास्त मात्रेच्या गोळ्या व औषधे घ्यावी लागत आहेत. अयोग्य आहार, प्रदुषण, चुकीची जीवनशैली यामुळे यात वाढ झाल्याचे त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात.

हे लक्षात ठेवा
१ वेळीच त्वचाविकार तज्ज्ञांकडे जा. सुरुवातीपासूनच योग्य उपचार करा.
२ कडुनिंबाची पाने, धणे आणि गूळ यांचे सेवन करा.
३ मांसाहार टाळा.
४ मैदा, बेकरीतील पदार्थ याचे सेवन करणे टाळावे.
५ इटली, डोसा यांसारखे आंबावलेले पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसात टाळा.
६ शिळे अन्न, लोणचे, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ, मसालेदार भाज्या, उडीदडाळ पापड, हिरवी मिरची टाळा.
७ आहारात लवकर पचणारे पदार्थ घ्या.
८ नियमित व्यायाम करा, योगासने करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु