चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार, ‘हे’ आहेत १० जबरदस्त उपाय

चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार, ‘हे’ आहेत १० जबरदस्त उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  पदार्थाला रंग आणि चव देणारी हळद प्रत्येक स्वयंपाक घरात वापरली जाते. शिवाय, तिच्यातील औषधी गुणधर्मामुळे अनेक आजारावर ती गुणकारीदेखील आहे. यातील क्यूमिन सारखे अनेक औषधी घटक असल्याने गंभीर आजारांपासून बचाव होतो. हळद इतर औषधी पदार्थांसोबत वापरल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात. याविषयी माहिती घेवूयात.

१) जखम
Image result for जखम

अर्धा चमचा हळद, थोडा चुना, एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.

२) घशात वेदना
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार, ‘हे’ आहेत १० जबरदस्त उपाय

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.

३) त्वचारोग
Related image

एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून नियमित लावा.

४) सांधेदुखी
Image result for सांधेदुखी

अर्धा चमचा हळदीमध्ये दोन चमचे अद्रकचा रस मिसळून गरम करा. हे वेदनेच्या ठिकाणी लावा.

५) खोकला
Image result for खोकला

अर्धा चमचा हळदमध्ये पाच मिरे बारीक करून हे कोमट दुधासोबत घ्या. मधसुद्धा घेऊ शकता.

६) मजबूत हाडे
Image result for मजबूत हाडे

अर्धा चमचा हळद अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्या.

७) मजबूत हिरड्या
अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरड्यांची मालिश करा.

८) चमकदार दात
Image result for मजबूत हिरड्या

अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिसळून दात घासा.

९) सर्दी-पडसे, ताप
Image result for सर्दी-

एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.

१०) जखम
Image result for जखम

जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु