झोपताना घेऊ नका उशी, सौंदर्य वाढेल, मिळेल चांगली झोप, ‘हे’ आहेत ६ फायदे

झोपताना घेऊ नका उशी, सौंदर्य वाढेल, मिळेल चांगली झोप, ‘हे’ आहेत ६ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सौंदर्याच्या बाबतीत महिला अतिशय जागरूक असतात. यासाठी त्या विविध उपाय सतत करत असतात. सौंदर्य प्रसाधने, ब्यूटी पार्लरमध्ये जाणे, असे उपाय त्या करत असतात. परंतु, सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप आवश्यक असते हे अनेक महिलांना माहित नसते. जर तुम्हाला चांगली झोप आणि सौंदर्य हवे असेल तर झोपताना उशी घेऊ नका. उशी न घेण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

उशी न घेण्याचे हे फायदे
१ उशी न घेता झोपल्यास पिंपल्स येत नाहीत. खराब पिलो कव्हरमुळे पिंपल्स होण्याची शक्यता असते.

२ उशी वापरल्याने चेहèयावर दबाव पडल्याने अकाली सुरकुत्या येतात.

३ उशी घेतल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरही थकवा जाणवतो. तर उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते. त्वचा फ्रेश राहते. नेहमी तरुण दिसू शकता.

४ निद्रानाशाची समस्या असल्यास उशी न घेता झोपावे. यामुळे शांत झोप लागते. शरीर रिलॅक्स होऊन चेहèयाचा ग्लो आपोआप वाढतो.

५ चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो. तेजस्वी दिसतो. जागरणाने चेहरा ताणलेला दिसतो.

६ उशी न घेता झोपणे अधिक फायदेशीर आहे. यामुळे शरीर नैसर्गिक स्थितीत राहते. लहान मुलांसारखी शांत झोप लागते. आरोग्य उत्तम राहते. सौंदर्य वाढते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु