डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हे शरीराचे खूप महत्वाचे इंद्रिय आहे. यासाठी डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. हेच डोळे आपल्या शरीराचे आरोग्य कसे आहे याचे संकेत देत असतात. कधीकधी विविध व्हायरस आणि संसर्गांमुळे डोळे लाल होतात. अशाप्रकारे डोळे लाल होणे हे सामान्य मानले जाते. डोळ्यांच्या संसर्गामुळेही डोळे लाल होणे, त्यातून पाणी निघणे, डोळ्यांच्या चारही बाजूंनी सूज येणे आणि प्रकाशाच्या प्रतिसंवेदनशील होणे अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. डॉक्टर्स यासाठी अँटिव्हायरल ड्रॉप्स घेण्याचा सल्ला देतात. डोळ्यांचे त्रास होण्याची आणखीही काही कारणे आहेत.  डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर दीर्घ काळापर्यंत किंवा कायमस्वरूपी लाल रंगाचा चट्टा दिसणे हा उच्च रक्तदाबाचा संकेत असू शकतो. अशा स्थितीत पीडिताच्या रक्तवाहिन्या सामान्यापेक्षा अधिक पसरतात. एवढेच नाही तर अनेकवेळा वाहिन्या बस्ट म्हणजे फाटण्याचाही धोका असतो. हे खूप धोकादायक असते.

जर एक डोळा अचानकपणे लाल झाला असेल तर हे हॅमरेज असू शकते. अशावेळी आयबॉलच्या पुढच्या भागाच्या पातळ थरावर रक्त लीक झाल्यावर झळकू लागते. ही समस्या शक्यतो वयोवृद्धांमध्ये दिसून येते.रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो. डोळे कोरडे पडू लागतात. अशा वेळी या महिलांनी दर दहा मिनिटांमध्ये २० सेकंदांसाठी डोळे बंद करत राहावे. याशिवाय एअर-कंडीशंनर कार्यालयात काम करणे किंवा दीर्घ काळापर्यंत लेंस लावल्यास सुद्धा डोळे कोरडे होतात. डोळ्यांचा ओलावा कायम राहण्यासाठी आय ड्रॉप्स वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेव्हा डोळ्यांची अश्रू वाहिनी ब्लॉक होते तेव्हा डोळ्यांतून अश्रू येणे बंद होते. अशावेळी या वाहिन्यांतून चिकट पदार्थ बाहेर येतो. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा रूग्णाच्या डोळ्यांच्या चारही बाजूंनी सूज येते किंवा वेदना होऊ शकतात.

वाढत्या वयासोबत त्वचेचे कोलेजन म्हणजेच त्वचेत असलेले एक प्रकारचे प्रोटिन आकसले किंवा कमी झाल्यावर असे होणे सामान्य बाब आहे. डोळ्यांखाली सूज येणे मधुमेहाने पीडित असलेल्या व्यक्तीची मस्क्युलर किंवा नव्र्ह डॅमेज झाल्यावर डोळ्यांच्या खालची त्वचा लटकायला लागते. यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे याकडे कानाडोळा न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. अनेकदा डोळ्यांचे ऑइल ग्लँड्स ब्लॉक झाल्यावर सुद्धा असे होऊ शकते. अशावेळी रूग्णाच्या डोळ्यातून फ्लूइड निघू शकत नसल्यास डोळ्यांच्या पापण्यांवर वाटाण्याइतकी सूज दिसून येते. गरम कापडाने डोळे शेकल्याने डोळ्यांना आराम मिळतो. तसेच कार्निअलमध्ये काही कारणांनी अपघर्षण झाल्यामुळे तीव्र वेदना होतात. ही समस्या आपोआपच बरी होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु