आरोग्यानामा ऑनलाइन – सिगारेट आणि तंबाखू खाण्यामुळे कॅन्सर होतो, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. तसेच हेच कॅन्सरचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. परंतु, नवीन संशोधनानुसार कॅन्सर होण्याचे मुख्य कारण हे लठ्ठपणा असल्याचे समोर आले आहे. लठ्ठपणामुळे कॅन्सराचा धोका अधिक बळावू शकतो. रिसर्च यूकेच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या यासंदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे या अहवालात
1 आगामी काळात 25 वर्षांखालील स्त्रियांना कॅन्सर होण्याचे मोठे कारण लठ्ठपणा ठरू शकते.
2 सतरा वर्षांच्या आतील महिलांनामध्ये जवळपास तेवीस हजार प्रकरणांत लठ्ठपणामुळे तर पंचवीस हजार प्रकरणात धुम्रपानामुळे कॅन्सर रोग होण्याची शक्यता आहे.
3 दैनंदिन जीवनात जर हाच ट्रेंड राहिला, तर 2043पर्यंत महिलांना कॅन्सर होण्यामागील सर्वात मोठा धोका लठ्ठपणा ठरू शकते.
4 पुरुषांसंबंधात ही आकडेवारी जास्त आहे. कारण पुरुषांमध्ये धुम्रपानाचे प्रमाण अधिक असते.
5 महिलांना कॅन्सर होण्याच्या प्रमुख कारणांबाबत चर्चा करायची झाली तर, धुम्रपान आणि लठ्ठपणा यामध्ये आता अधिक अंतर राहिलेले नाही. महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण अधिक पाहायला मिळते.
6 लठ्ठपणा हा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक मोठा धोका बनला आहे आणि यावर जर वेळीच उपाय केले नाही तर स्थिती अधिक भयंकर होऊ शकते. धुम्रपानाची सवय सोडवण्यासाठी जशी जाहीरात केली जाते तशीच जंक फूडच्या बाबतीत केली पाहिजे.