आरोग्यनामा ऑनलाइन – प्लास्टिकचा डब्बा, कंटेनर, बादली, बॉटल अशा वस्तूंवर एका त्रिकोणामध्ये एक नंबर असतो. यास रेजीन आयडेंटिफिकेशन कोड म्हणतात. या कोडवरून ती वस्तू बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर केला गेला, हे समजते. यावरूनच प्लास्टिकची ती वस्तू वापरणे हानिकारक आहे की नाही, हे कळू शकते. मात्र हे कोड अधिकृतरीत्या सुरक्षीततेची पुष्टी करत नाहीत. १ ते ६ कोड विशिष्ट प्लास्टिक पॉलिमरविषयी माहिती देतात. तर ७ या कोडमध्ये इतर सर्व प्लास्टिक्सचा समावेश असतो.
* रेजीन आइडेंटीफिकेशन कोड हॅश १ (पीईटी किंवा पीईटीई) पॉलीथीन टेरेफेथलेट
– दीर्घकाळ अँटीमनी ट्रायऑक्साईडच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना श्वास व त्वचेसंबंधी विकार आणि महिलांना मासिक पाळी व गर्भपातामध्ये अडचणी येऊ शकतात. मात्र, हे सिद्ध होऊ शकलेले नाही.
* रेजीन आइडेंटीफिकेशन कोड हॅश २ (एचओपीई), उच्च घनत्वाचे पॉलिथीन
– उन्हामध्ये यामधून नोनिलफेनॉल हे रसायन स्त्रवू शकते. यामुळे हार्मोन्सच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
* रेजीनन आइडेंटीफिकेशन कोड हॅश ३ (व्ही, पीव्हीसी) पॉलीविनायल क्लोराइड
– आरोग्य आणि पर्यावरणावर या प्लास्टिकचा गंभीर परिणाम होतो. यात घातक विषारी रसायन असतात. हवेच्या संपर्कात आल्याने पारा, शिसे असे घातक पदार्थ तयार होऊ शकता. पर्यावरणातील सर्व अन्न साखळीवर विपरीत परिणाम होतो.
* रेजीन आइडेंटीफिकेशन कोड हॅश ४ (एलडीपीई) कमी घनत्वाचे पॉलिथीन
– हे सुर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यास यामुळे हार्मोनल प्रॉब्लेम्स होण्याची शक्यता असते.
* रेजीन आइडेंटीफिकेशन कोड हॅश ५ (पीपी) पॉलीप्रोपाइलीन
– यामुळे फुप्फुसांचे आजार होऊ शकतात.
* रेजीन आइडेंटीफिकेशन कोड हॅश ६ (पीएस) पॉलिस्टेयरन
– यामधून स्टेरिन हे रसायन स्त्रवते, जे कँसरचे कारण ठरू शकते. यास विषारी पदार्थ मानले जाते. याचा वापर अतिशय घातक आहे.
* रेजीनन आइडेंटीफिकेशन कोड हॅश ७ (ओ)
– याचा वापर हानिकार असू शकतो.
हे लक्षात ठेवा
कोणतेही प्लास्टिक पुर्ण सुरक्षित नाही. खुप गरज असल्यास २, ४ आणि ५ कोड असलेल्या प्लास्टिकचा अत्यंत कमी वापर करा. मात्र १, ३, ६ आणि ७ कोड असलेल्या प्लास्टिकच्या वस्तू वापरणे टाळले पाहिजे.
- आरोग्यविषयक वृत्त –फ्रिजमध्ये पदार्थ ठेवण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा, ठराविक वेळेपर्यंतच ते राहतात ताजे
- ‘या’ कारणामुळे पिरियड्सच्या ७ दिवसांपूर्वी महिलांना होते ‘ही’ समस्या
- आरोग्य सेवेतील उत्तम कामगिरीसाठी मदरहुड रुग्णालयाला ”फिक्कीचा” राष्ट्रीय पुरस्कार
फक्त ७ दिवसांत कमी करा ४ किलो वजन, असा आहे ‘डाएट प्लॅन’ - सुकामेवा अशाप्रकारे खाल्ल्यास, अपेक्षेपेक्षा दुप्पट होईल फायदा, जाणून घ्या
- तुम्हाला असेल ‘या’ ७ पैकी कोणताही एक आजार, तर पिऊ नका लिंबू पाणी
- त्वचेवर झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने उजळतो चेहरा ! जाणून घ्या १० फायदे
- ब्रेड खाण्यापूर्वी ‘हे’ अवश्य वाचा, नंतर चुकूनही खाणार नाही
- ‘होम फेशियल’च्या ५ सोप्या पद्धती, पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, दिसाल सुंदर
- रोज ‘खा’ पाण्यात भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा, होतील ‘हे’ ५ फायदे