पुणे: आरोग्यनामा ऑनलाईन : २१ जून ला योगदिवस आहे. लोकांना योगाच महत्व कळावं म्हणून पंतप्रधान मोदी प्रत्येक आसनाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेयर करत आहेत.आज मोदींनी शशांकासनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी योगाला आपल्या आयुष्यात किती महत्व आहे. हे आसन कसे करावे ? त्याचे फायदे ? काय आहेत ? हे सर्व आहे.
* शशांकासन कसे करावे *
शशांकासन या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती सश्या सारखी होते. हे आसन करताना सर्वात प्रथम वज्रासन स्थितीत बसावे.त्यानंतर दोन्ही हात दोन्ही पायांच्यावरती ठेवून पाय जेवढे लांब ताणता येतील तेवढे ताणावे. तसेच पाय दुमडले असल्याने दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना चिकटणे महत्वाचे आहे. त्यानंतर पायावरील हात काढून ते बसलेल्या स्थितीच्या मधोमध ठेवावे. आणि हळूहळू श्वास सोडावा. असे केल्यानंतर दोन्ही हात काही सेकंदानी पुढे सरकवावे.मात्र दोन्ही हात हे समांतर बाजूने पुढे सरकायला हवेत. अशा प्रकारे हे आसन करावे.
* शशांकासनाचे फायदे *
१) हे आसन केल्यामुळे मनावरील ताण कमी होतो.
२) या आसनामुळे रागावर नियंत्रण राहू शकते. त्यामुळे ज्यांना जास्त राग येतो. त्यांनी हे आसन टाळावे.
३) या आसनाचा महत्वाचा फायदा म्हणजे पोटाचे सर्व विकार दूर होतात.परंतु ज्यांना उच्च रक्तदाब आणि पाठीच्या आजारांची समस्या आहे. त्यांनी हे आसन करणे टाळावे.
Watch this video on Shashankasana.
Make Shashankasana a part of your routine and see the positive changes it brings to your lifestyle. #YogaDay2019 pic.twitter.com/8AvHuzr2Oc
— Narendra Modi (@narendramodi) June 15, 2019