आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अमेरिकन वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी डिमेथॅन डड्ढोलोन अनडिकॅनोट (डीएमएयु) नावाची गर्भनिरोधक गोळी तयार केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या औषधाची चाचणी माकडांवर यशस्वी झाली आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी हे संशोधन केले आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
१ महिलांप्रमाणेच पुरुषांनाही दररोज ही गोळी घ्यावी लागते.
२ पुरूषांच्या शरीरातील ज्या नलिकेद्वारे शुक्राणू लिंगापर्यंत जातात त्या नलिकेत व्हेसलक्रिम टाकली जाते.
३ गर्भनिरोधनासाठी पुरूषांसाठी कंडोम आणि नसबंदी नंतर हा तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Visit : arogyanama.com