• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
Arogyanama
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home माझं आराेग्य

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

by Sajada
January 18, 2021
in माझं आराेग्य
0
pregnancy test

pregnancy test

47
VIEWS


आरोग्यनामा ऑनलाईन- 
जेव्हा मासिक पाळी चुकते आणि त्यावेळी स्त्रियांच्या मनात पहिला प्रश्न येतो की, मी गरोदर आहे का? कारण सामान्यत: मासिक पाळी थांबणे हे गरोदर(pregnancy test ) असल्याचे पाहिले लक्षण म्हणून ओळखतात. स्त्री विवाहित असेल आणि तिला खरंच आई व्हायचे असले तर तिच्यासाठी हे सकारात्मक लक्षण असतं. पण, ज्या तरुणी अविवाहित असतात त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरते. पण, स्त्री विवाहित असो वा अविवाहित आपण गरोदर(pregnancy test ) आहोत की नाही? याची खात्री करण्याची इच्छा तिला असते. यासाठी जाणून घेऊया आता घरच्या घरी कशी करयची प्रेग्नेंसी टेस्ट.

गरोदर आहे की नाही पाहण्यासाठी प्रेग्नेंसी टेस्टचा आधार घेतला जातो. आता तुम्ही घरातल्या घरात स्वत:हून स्वत:ची प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. पण, समजा तुमच्याकडे ते प्रोडक्ट नसेल तर? अशावेळी घरगुती वस्तूंचा वापर करूनही प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. आज आम्ही तुम्हाला डेटॉलचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे प्रेग्नेंसी टेस्ट करू शकता? याची माहिती घेऊया

लागणारे साहित्य
प्रेग्नेंसी टेस्टसाठी एक चमचा डेटॉल, एक छोटा रिकामा डब्बा किंवा डिस्पोसेबल ग्लासची आवश्यकता असते. डेटॉलच्या माध्यमातून गरोदरपणाची खात्री करून घेण्यासाठी सकाळचे पहिले युरीन आवश्यक असते. या प्रेग्नेंसी टेस्टसाठी सकळी पहिली लघुशंका झाल्यावर युरीन जमा करावे. जेवढे युरीन डब्ब्यात घेतले आहे त्यापेक्षा कमी प्रमाणात दुसर्‍या ग्लासमध्ये डेटॉल घ्यावे. आता युरीन आणि डेटॉल एकमेकांत मिक्स करून 5 मिनिटे वाट पहा.

आता यातून गरोदरपणा आहे की नाही हे कसे कळणार? आता जाणून घेऊया की या टेस्टमधून स्त्री गरोदर आहे की नाही? हे कसे ओळखावे. जर युरीन आणि डेटॉल एकमेकांत मिक्स केल्याने त्याला फेस आला तर त्याचा अर्थ हा आहे कि रिझल्ट पॉझिटीव्ह आलाय. जर हे मिश्रण आहे तसेच राहिले आणि त्याला कोणताही फेस आला नाही तर समजावे की रिझल्ट निगेटिव्ह आहे, अर्थात स्त्री गरोदर नाही.

हि टेस्ट किती प्रमाणात अचूक परिणाम दाखवते. गरोदर स्त्रीच्या युरीनमध्ये एचसीजी हार्मोनचा स्तर सर्वाधिक असतो. सामान्यत: युरीनमध्ये अ‍ॅसिड असते. तर डेटॉलमधील मुख्य घटक क्लोरोक्सिलीनॉल असतो. असे म्हणतात की, जेव्हा क्लोरोक्सिलीनॉलसह युरीनमधील मुख्य घटक मिक्स होतो तेव्हा युरीनचा रंग बदलतो अन् त्यावर फेस येतो. त्यामुळे जेव्हा असे होते तेव्हा ती स्त्री गरोदर आहे असे समजले जाते. जर तसा काहीच बदलत मिश्रणात दिसला नाही तर स्त्री गरोदर नाही, असे मानतात.

या टेस्ट बाबत वैज्ञानिकांची एकमते नाहीत. काहींच्या मते ही टेस्ट अचूक परिणाम दाखवते तर अनेकांच्या मते प्रत्येक वेळी ही टेस्ट अचूक परिणाम दाखवेल असे नाही. पण, एकंदर पाहता ही टेस्ट सुरक्षित समजली जात आहे. कारण, यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही. केवळ स्वत:च्या समाधानासाठी स्त्री एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. जेव्हा हातात कधीही दुसरे साधन नसेल तेव्हा स्त्रीने या पद्धतीचा वापर केल्यास हरकत नाही, असे जाणकार आवर्जून सांगतात.

केवळ मासिक पाळी वेळेवर न येणे हे आपण गरोदर असल्याचे लक्षण अशू  शकत नाही. त्यशिवाय सुद्धा अनेक अशी लक्षणे आहेत, जी दर्शवतात की ती स्त्री गरोदर आहे. थकवा, मळमळ, उलटी, मूड बदलणे, वारंवार लघवी होणे, स्तन दुखणे यांसारखी लक्षणे सुद्धा दिसू लागल्यावर आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच त्यांच्या देखरेखीखालीच टेस्ट करावी. कारण ही सर्व लक्षणे गरोदरपणाची आहेत. अशावेळी स्त्रीने जास्त वेळ न दवडता वैद्यकीय सहाय्यता घेऊन उपचार सुरु करणे आवश्यक आहे.

 

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

Tags: pregnancy testडेटॉलडॉक्टरप्रेग्नेंसी टेस्टमासिक पाळीस्त्री
Previous Post

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

Next Post

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

Next Post
stomach

'तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय', अन्यथा...

Stomach Ache
माझं आराेग्य

‘पोटदुखी’ चे 7 निश्चित घरगुती उपाय ज्यांनी तुम्हाला अराम मिळू शकतो; जाणून घ्या

by omkar
February 28, 2021
0

आरोग्यनामा ऑनलाईन- 'पोटदुखी' च्या समस्येवर आयुर्वेद काही प्रभावी घरगुती उपाय सुचवितो. अयोग्य आणि असंतुलित आहारामुळे या समस्या उद्भवतात. ही सर्वात वेदनादायक...

Read more
coconut pasta

जाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe

February 27, 2021
cancer

Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या

February 27, 2021
cholestrol

कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी? हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…

February 27, 2021
Heart Health

Heart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा

February 27, 2021
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 Arogyanama - All Rights Reserved Arogyanama.