आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या सर्वांना सोयाबीनचे फायदे तर माहीतच असतील. सोयाबीन शरीरासाठी खूपच उपयुक्त असते. पण सोयाबीनचे दूधही आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल आणि अन्य जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जर आपण सोयाबीनवर योग्य प्रकारे प्रक्रिया केली तर आपण सोयाबीनचे पौष्टिक दूध तयार करू शकतो.
हे सोयाबीनचे दूध आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असते. या सोया दुधापासून आपण दही, ताक, लस्सी, श्रीखंड , पनीर, आईस्क्रीम , आम्रखंड तयार करू शकतो. एक किलोग्रॅम सोयाबीनपासून ७-८ लिटर सोया दूध आपण तयार करू शकतो. सोयाबीनचे दूध तयार कारण्यासाठी फक्त दहा रुपये प्रति लिटर इतका खर्च येतो. हे दूध आपल्याला गायी- म्हशीच्या दुधाच्या तुलनेत फक्त अर्ध्या दारात उपलब्ध होऊ शकते.
सोया दूध तयार करण्याची पद्धत
– सर्व प्रथम सोयाबीनचे टरफल काढून डाळ तयार करून घ्यावी.
– आत ही डाळ ६ ते ८ तास पाण्यामध्ये भिजवावी.
– भिजलेली डाळ गरम पाण्याबरोबर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.
– हे मिश्रण १५ ते २० मिनिटांपर्यंत उकळून कापडातून गाळून घ्यावे.
– गाळल्यानंतर पौष्टिक सोया दूध मिळते.