आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हसण्याने आरोग्य चांगले राहते. यामुळे शरीरातील विविध अवयव क्रियाशिल होतात. म्हणूनच अनेक ठिकाणी सकाळी हास्ययोग करताना अनेक लोक दिसतात. परंतु, हसण्याप्रमाणेच रडण्याचेही फायदे आहेत. हुंदके देऊन रडणे शरीरासाठी फायदेशीर असते. हमसून रडण्याचे कोणते फायदे असतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
1 डोळ्यांतील पाण्यातूनही शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
2 रडल्याने शरीरातून एड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्यूसीन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात.
3 डोळ्यांतील मेमब्रेनला अश्रू सुकू देत नाहीत. हे कोरडे झाल्यामुळे डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
4 अश्रूंमधील लायसोजाइम तत्व वातावरणातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी सहायक ठरतात.
5 डोळ्यांना इन्फेक्शन होत नाही.
6 डोळे हेल्दी राहण्यास मदत होते.
7 रडल्यामुळे तणाव दूर होतो.
8 मूडही चांगला राहतो.
9 डिप्रेशनमध्ये रडणे सर्वात चांगला उपाय मानला जातो.