खूप प्रयत्न करूनही कमी होत नाही ‘वजन’ ? ‘ही’ ७ कारणे, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइझ करून देखील अनेकांचे वजन कमी होत नाही. एव्हाना वाढतच जाते. आजकाल वजन कमी असणं आणि सुडौल बांधा मिळवण्यासाठी महिलांसह पुरुष देखील प्रयत्न करत असतात . यात खानपान आणि व्यायाम याचे कठीण सूत्र पळून देखील काहींचे वजन कमी होऊ शकत नाही. त्यामुळे नैराश्य तर येतेच त्यासोबत अधिक वजनाने अनेक आजारांना देखील आमंत्रण मिळते . परंतु व्यायाम करून आणि खानपानाच्या सवयी बदलून देखील वजन का कमी होत नाही ? याची कारणे आपण जाणून घेऊयात.
१. अधिक मीठ खाणे टाळा
सकाळी उठल्यानंतर चेहेऱ्यावर जर सूज दिसत असेल तर तुमच्या शरीरामध्ये मिठाचे प्रमाण अधिक आहे समजावे. मिठाच्या अधिक सेवनाने किडनीवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील पाणी बाहेर पडण्यास अडथळे येतात . शरीरातील या अधिक पाण्याने वजन कमी होत नाही .
२. व्यायाम एकाच रुटीनमध्ये करणे
व्यायाम एकाच रुटीनमध्ये केल्याने सुरवातीला वजन घटल्याचे दिसले तरी हळूहळू त्यात बदल दिसून येणे बंद होते . शरीराला या व्यायाम प्रकाराची सवय होते आणि शरीर त्याला परिणाम देणे बंद करते . त्यामुळे रोज सारखाच व्यायाम करण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम करावा.
३. पौष्टिक पदार्थांचे अधिक सेवन
पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे हे वजन कमी आणि अधिक करण्यासाठी आवश्यक आहे . परंतु कोणत्याही पदार्थाचे अधिक सेवन करणे हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे . पौष्टिक पदार्थांचे सेवन भलेही वजन वाढवत नसले तरी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मात्र बाधा निर्माण करू शकते.
४. आपल्या शरीरातील हार्मोन्सचा अंदाज न घेता खाणे
प्रत्येकाच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी हि अनेक कारणांनी वेगवेगळी असते . त्यामुळे जर अनेक प्रयत्न करून देखील वजन कमी होत नसेन तर वैद्यकीय सल्ला घेऊन हार्मोन्सची तपासणी करावी आणि त्याप्रमाणे डाएट आणि व्यायाम करावा.
५. उशिरा जेवण करणे टाळा
वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवणाच्या वेळा पाळणे अत्यंत महत्वाचेआहे . त्यात रात्रीचे जेवण हे नेहमी हलके आणि झोपण्याच्या २ तास आधी करावे . जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळावे . शतपावली करावी अर्थात केवळ १०० पावले चालावे . त्यामुळे मेटॅबॉलिझम प्रक्रिया पूर्ण होऊन फॅट्सचे रूपांतर एनरजी मध्ये होते.
६. झोपेच्या वेळा सांभाळा
२४ तास पैकी ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. दुपारी झोप घेणे टाळावे. वामकुक्षी ही केवळ २० ते ३० मिनिटेच घ्यावयाची असते.
७. वजन कमी करण्यासाठी काही जण योग्य सल्ला न घेता शरीराला बाधक अशा मार्गाचा अवलंब करतात. वजन कमी – जास्त करण्यासाठी नेहमी तज्ज्ञ किंवा वैद्यकीय सल्ला घेऊनच सुरुवात करावी.
Comments are closed.