आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे नॉर्मल डिलेव्हरी हे महिलांसाठी एक आव्हान झाले आहे. यामुळे सिजेरियनचे प्रमाण वाढले आहे. अशा डिलेव्हरीनंतर महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणून नॉर्मल डिलेव्हरीकडे सर्वांचा कल असतो. नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी काय करावे, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
पाणी प्या
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. गर्भाशयात बाळ एका पातळ पिशवी एमनियोटिक फ्लयूडमध्ये असते. यामुळे बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे नियमित ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
नियमित चाला
गरोदरपणात चालणे खुप गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक समस्या निर्माण होतात.
व्यायाम
योग आणि व्यायाम हे गरोदरपणात खुप महत्त्वाचे असते. गरोदर होण्यापुर्वीपासूनच नियमित व्यायाम केल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्याची जास्त शक्यता असते.
आरोग्य
आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. बाळाला जन्म देताना जास्त वेदना सहन कराव्या लागतात. शरीर कमजोर असल्यास या वेदना सहन करणे सोपे नसते. आरोग्य चांगले असेल तर डिलेव्हरीच्या वेळी कमी वेदना होतील.
आहार
या काळात योग्य आहार घ्या. नॉर्मल डिलेव्हरीमध्ये शरीरातून तीन ते चार एम.एल. रक्त जाते. यासाठी ताकद असणे खुप महत्त्वाचे असते. यामुळे आयर्न आणि कॅल्शियमची खुप आवश्यकता असते.