३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

heart

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : वैज्ञानिकांनी एक असे कॅल्क्युलेटर तयार केले आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या धोक्याची माहिती मिळेल. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार हे कॅल्क्युलेटर लाइफस्टाइलविषयी महत्त्वाची माहिती देते. आरोग्याची माहिती सांगण्यापूर्वी कॅल्क्युलेटर वजन, उंची आणि लाइफस्टाइलची माहिती विचारते. या संपूर्ण प्रक्रियेला ३ मिनिटे लागतात. आपले वय आणि हृदयाचे वय यामध्ये किती तफावत आहे,तसेच किती निरोगी याविषयाची माहिती या ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळू शकते.

हे मॉडेल कॅनडातील ओटावा हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आले असून काम करणारे वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार हृदयाचे आरोग्य हे मॉडेल किती टक्के बरोबर सांगते या स्टडीसाठी १,०४,२१९ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला होता. २००१ ते २००७ पर्यंत झालेल्या या रिसर्चमध्ये या कॅल्क्युलेटरला हृदय रोगांपासून वाचणाऱ्या एका टूलप्रमाणे वापरण्यात आले.अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर समजले की, हे मॉडेल कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे आरोग्य स्पष्टपणे सांगण्यात सक्षम आहे. पुढील पाच वर्षात होणारे हृदय आजारांची माहिती देण्यासाठी हे कॅल्क्युलेटर सक्षम आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन कॅल्क्युलेटर हृदयाचे वय सांगते. ज्यामुळे भविष्यातील धोक्याची माहिती समजते. हृदय विकारांची माहिती देण्याव्यतिरिक्त असे का होत आहे, याविषयीची माहितीसुद्धा हे कॅल्क्युलेटर देते. हे वय, स्मोकिंग,अल्कोहोल डायट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, तणाव, डायबिटीज, ब्लडप्रेशर या गोष्टींच्या आधारे माहिती देते.

ओटावा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि वरिष्ठ वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार बहुतांश लोक हेल्दी लाइफस्टाइल असल्याचे सांगतात परंतु याविषयी डॉक्टरांकडून माहिती घेत नाहीत. याव्यतिरिक्त डॉक्टरसुद्धा रुग्णाचे केवळ ब्लडप्रेशर आणि कोलेस्टरॉल लेव्हल चेक करतात परंतु लाइफस्टाइलविषयी काहीच विचारात नाहीत.यामुळे लाइफस्टाइलमध्ये सुधारणा होत नाही आणि हार्टअटॅकचा धोका निर्माण होतो. प्रोफेसर मॅन्युअल यांच्यानुसार या प्रोजेक्टला बिग लाइफ नाव देण्यात आले आहे. वेबसाइट https://www.projectbiglife.ca वर जाऊन आरोग्याची माहिती समजू शकते. हे मॉडेल सध्या कॅनडात वापरण्यात येत आहे. वल्र्ड हेक्सथनुसार इतर देशांमध्येही हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर वापरले जाऊ शकते.