आरोग्यनामा ऑनलाइन – अकाली वृद्धत्व ही समस्या खूपच वाढली आहे. महिला, पुरूष दोघांमध्ये ही समस्या दिसून येते. महिलांमध्ये पिंपल्स, सुरकूत्या, पांढरे केस यामुळे लवकर म्हातारपण आल्यासारखे वाटते. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे उपाय केल्यास तारूण्य अबाधित रहाते. या उपायांची माहिती आपण येथे घेणार आहोत.
आपले तारूण्य टीकवण्यासाठी मुलींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. यासाठी काही स्वत:साठी काही नियम करून घेतल्यास तसेच काही घरगुती उपाय केल्यास आपण नेहमीच सुंदर, चिरतरूण राहू शकता. यासाठी रात्री झोपण्याअगोदर मेकअप काढणे विसरु नका. मेकअप तसाच ठेवून झोपल्याने स्किन खराब होते. यासोबत त्वचेमधील रोम छिद्र हळुहळू बंद होऊन स्किनची चमक गायब होते. याचा परिणाम हळुहळू याचा परिणाम दिसतो. आळसामुळे ज्या तरुणी मेकअप न काढता झोपतात त्यांची स्किन खुप लवकर वयस्क होते.
रात्री झोपण्याअगोदर स्वतः फेशियल करावे. चांगल्या तेलाने स्किनची मसाज करा. यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. यामुळे ब्लड सर्कुलेशन वाढते आणि त्वचेचे तेज वाढते. तसेच रात्री झोपताना केस विंचरुन झोपल्यास केस गळत नाहीत. शिवाय रक्त प्रवाह चांगला राहतो. कोमट पाण्यात मीठ मिसळून चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा साखरेने स्क्रब करता येईल. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि स्किन चमकते. तसेच मीठाच्या पाण्यामुळे चेह-यावर थकवा राहणार नाही. डोळ्यावर गुलाब जलमध्ये भीजवलेला कापूस ठेवल्यास डार्क सर्कल कमी होतात. शिवाय डोळ्यांना आराम मिळू शकतो.