आरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळा आणि आंबट गोड चवीची कैरी याचं एक अनोखं नात आहे. लहानापासून ते थोरापर्यंतसगळ्यांनाच भुरळ घालणारे हे पन्हे काय काय फायदे देयू शकतात.
शरीर रिहायड्रेट करतं
कैरीच्या पन्हाचं सर्वात मुख्य कार्य म्हणजे त्यामुळे शरीर रिहायड्रेट राहतं. त्यातील कैरी, मीठ आणि साखर या घटकामुळे शरीरातील इलेक्टिक बॅलन्स चांगले राहतात.
डोळ्यांना संरक्षण
उन्हाळ्यात सूर्यकिरणांचा डोळ्यांना त्रास होतो, अशा वेळी कैरीचं पन्हं पिणं चांगलं आहे. त्यातील व्हिटॅमिन ए हा घटक डोळ्यांना संरक्षण देतो.
भरपूर न्यूट्रिएंट्स असतात
पेक्टिन हा घटक फक्त कैरीत आढळून येतो. याशिवाय त्यात ए, बी-1, बी-2, बी-6, सी, निआसिन आणि फोलेट्स हे घटक असतात. त्यामुळे एक ग्लासभर पन्हं तुमच्या शरीराला आवश्यक असलेलं दिवसभराचं आयर्न पुरवतं.
पचनसंबंधी समस्या दूर होतात
कैरीमध्ये पेक्टिन भरपूर प्रमाणात असतं. पेक्टिन हा घटक शरीरात पचनक्रिया सुरळीतत करतं. त्यामुळे डायरिया, मूळव्याध, गॅस्ट्रोएन्टरायटिस, मलावरोध अशा समस्यांपासून सुटका मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
बॅक्टेरियांशी लढण्यासाठी कैरीच्या पन्हं पिणं फायदेशीर आहे. यामध्ये असे घटक असतात जे यकृताला संरक्षण देतात. याशिवाय कावीळ, अनिमिया, कॉलरा यांसारख्या आजारांशी लढतात.
डिप्रेशनवर फायदेशीर
कैरीच्या पन्ह्यात व्हिटॅमिन बी-6 हा घटक असतो, ज्यामुळे मेंदूत तणाव दूर करणारे हार्मोन्स स्रवण्यास मदत होते. त्यामुळे मेंदूला आराम मिळतो. तसंच यात ग्लुटामाईन असिड असतं जे मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत करतं.