आरोग्यनामा ऑनलाईन टीम – व्यायाम करताना जर चुकीच्या पद्धतींनी केला तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतात. व्यायाम झाल्यानंतरही काही नियम पाळणे गरजेचे आहे. अन्यथा व्यायामाचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. त्यामुळे ह्या चुका टाळण्याचा प्रयत्न करून व्यायामाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करा. जाणून घेऊयात व्यायामानंतरही लोक काय चुका करतात याविषयी-
१) अचानक व्यायाम थांबवू नका
जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीराच्या तापमानाबरोबर रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात. ते पूर्वस्थितीत येण्यासाठी थोडा कालावधी लागतो. त्यामुळे हळू हळू व्यायाम करत शरीराला पूर्वस्थितीत आणा.
२) स्ट्रेचिंग न करणे
व्यायाम केल्यानंतर शरीराला स्ट्रेच करणे विसरू नका. कारण वर्कआउटनंतर शरीराला स्ट्रेच केले नाही तर स्नायूंमध्ये समस्या निर्माण होवून थकवा येतो.
३) व्यायामानंतर न खाणे
व्यायाम केल्यानंतर काहीतरी अवश्य खा. कारण त्यामुळे स्नायूंची झीज भरून निघते. व्यायाम झाल्यानंतर तुम्ही कार्ब्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेवू शकता. त्यासाठी दही, ब्लूबेरी किंवा मूठभर सुकामेवा उत्तम पर्याय आहे.
४) शॉवर न घेणे
व्यायाम केल्यानंतर शॉवर न घेतल्याने व्यायाम दरम्यान घाम सुकल्याने जिवाणूंचे संक्रमण होण्याची शक्यता असते. जिवाणूंचे संक्रमण टाळण्यासाठी व्यायामा नंतर शॉवर घेणे गरजेचे आहे.
५) कपडे न बदलणे
व्यायामानंतर लगेच कपडे न बदलणे आजाराला निमंत्रण ठरू शकते. व्यायामादरम्यान घाम आल्यामुळे कपडे ओले होतात. त्यामुळे जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर कपडे बदला.
६) पाणी न पिणे
व्यायाम करताना भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर अवश्य पाणी प्या.
७) अपुरी झोप घेणे
जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला किमान ७ ते ९ तासांची झोप आवश्यक आहे. झोपेदरम्यान स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे थकवा कमी होतो.