आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आत्ता पर्यंत ऐकलं असेल की जास्त चिंता केल्याने, ताणतणाव वाढल्याने आपले आयुष्य कमी होते. त्यामुळे आपण नेहमी ताणतणाव कसा कमी करायचा, त्यासाठी काय उपाय करावेत हाच विचार करत असतो. पण आता तुम्हाला आम्ही जे सांगणार आहोत ते सांगून तुम्हाला नवलच वाटेल. हो, कारणच तस आहे. आता आपल्याला आपले आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्हाला तणाव घ्यावा लागणार आहे. त्यामुळे तुमचे आयुष्य वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ह्यूस्टन मेथडिस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी उंदरांना तणाव आल्यावर त्याचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो. याचा या संशोधकांनी अभ्यास केला आहे. याला या संशोधकांनी क्रोमॅटिन स्ट्रेस’ असे नाव दिले आहे. यातून त्यांना सजीवाच्या डिएनएमध्ये काही बदल झाल्याचं दिसलं.
क्रोमॅटिन स्ट्रेस अनेक सजीवांमध्ये असतो. म्हणजेच तो माणसाच्या शरीरात पण असू शकतो. माणसाच्या शरीरातील वाढत्या प्रक्रियेला थांबवणं म्हणजेच आपले आयुष्य वाढवण्यासाठी हे मदत करतात. असे या संशोधकांनी सांगितलं आहे. यामुळे आता माणसाचे आयुष्य वाढण्यासाठी त्यांना तणाव घ्यावा लागणार आहे.