आरोग्यनामा टीम – वजन वाढल्यानं आता आणखी एक समस्या उद्भवत असल्याचं समोर आलं आहे. मानवी शरीरात दात आणि जबडा तयार करणाऱ्या एका खास जीन्स आणि लठ्ठपणाचा संबंध दात सडणं दात खराब होणं याच्यासोबत आहे. एखाद्या व्यक्तीचे अनुवांशिक गुण जसे की, लठ्ठपणा, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वांचा संबंध दातांशी संबंधित आजारांसोबत जोडला गेला आहे.
हृदयरोग आणि दात खराब होण्याचा संबंध
स्वीडनच्या युमिया युनिव्हर्सिटीच्या इंस्टिट्युट ऑफ ऑडॉनटोलॉजच्या इनगेगार्ड जोहान्सन यांच्या नुसार, रिसर्चमध्ये असं स्पष्ट झालं आहे की, दात आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हृदयरोग आणि दात खराब होण्याचा धोका यांचा खोलवर संबंध आहे. नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये 9 इंटरनॅशनल क्लीनिकल अभ्यासांचा समावेश आहे.
व्यक्तीचे जीन्स आणि दातांचा संबंध
रिसर्चमध्ये अभ्यासकांनी हृदयरोग आणि धूम्रपान, लठ्ठपणा, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्वात जेनेटीक संबंधांना पाहिलं. याचा दातांच्या आरोग्यासोबत काय संबंध आहे हेही समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या रिसर्चमध्ये बायोबँकमधील 4 लाख 61 हजार सहभागी लोकांच्या दातांच्या आरोग्याच्या व्यक्तिगत रिपोर्टचा समावेश करण्यात आला होता.
ब्रिस्टल पॉप्युलेशन हेल्थ सायन्स इंस्टिट्युटचे सायमन हावर्थ म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारचा रिसर्च ज्यांना दातांचा रोग होण्याचा जास्त धोका आहे त्या लोकांना ओळखण्यात जास्त मदत करेल.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.