आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या बॅक्टेरियल किंवा व्हायरल डिसिजमुळे संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरीक संबंध आल्याने एसटीडी म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिज हातो. या आजारावर योग्य वेळी उपचार केले नाही तर हा आजार गुप्तांगात वाढून हृदय, किडनी, लंग्स आणि लिव्हरसारख्या अवयवांना प्रभावित करतो. अशा परिस्थितीत वेळीच उपचार केले नाहीत तर जीवही जाऊ शकतो.
कुणाला होतो एसटीडी
१ जे एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शरीर संबंध ठेवतात.
२ ज्या व्यक्तीचे अनेकांसोबत संबंध आहेत अशा व्यक्तीसोबत संबंध ठेवल्यास.
३ जे शारीरीक सबंधाच्यावेळी कंडोमचा वापर करत नाहीत.
४ जे लोक इतरांनी वापरलेल्या इंजेक्शनने अंमली पदार्थ घेतात.
५ जे अनैसर्गिक शरीर संबंध ठेवतात.
ही आहेत लक्षणे
१ क्लॅमायडिया
युरिनमध्ये वेदना, पस अथवा रक्त पडणे. टेस्टीकल्समध्ये सजू येणे.
२ सिफलिस
सुरूवातीच्या स्टेजमध्ये जळजळ, खाज, रॅशेज, थकवा गळ्यात खवखव, डोकेदुखी, सूज.
३गोनोरिया
युरिन करताना वेदना, ग्रीन, व्हाईट अथवा यलो डिस्चार्ज, टेस्टिकलमध्ये सूज.
४हेपेटायटिस बी
ताप, जळजळ, मसल्स आणि जॉइंटमध्ये वेदना, उलटीची जाणीव, भूक न लागणे.
५ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस
पेनिसमध्ये पुरळ, सूज, जळजळ आणि वेदना.
६हर्पिज
खाज, जळजळ, पूरळ, भूक न लागणे, ताप, थकवा, कमजोरी.
असा करा बचाव
एकाच पार्टनर सोबत संबंध ठेवा. प्रतिबंधात्मक उपाय करा. नैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवा. नियममित चेकअप करा.