भाज्यांचे ज्यूस
भाज्या शरीरासाठी पोषक असल्या तरी सकाळच्या नाष्ट्यामध्ये भाज्यांच्या ज्यूस घेतल्यास दुष्पपरिणाम होऊ शकतो. कारण यामध्ये फायबर आणि प्रोटीन हे दोन्ही घटक नसतात. यामध्ये शुगर असल्याने नाष्ट्यासाठी हे योग्य नाही.
टोस्ट
सकाळी टोस्ट आणि जॅमसुध्दा खाऊ नये. यामध्ये गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट असते. याऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थ खावेत.
पेस्ट्री, डोनट
पॅनकेक, चॉकलेट
पॅनकेक, चॉकलेट असे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये खाणे टाळावे. हे पदार्थ सकाळी खाणे म्हणजेच आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे.
बर्गर
सकाळच्या नाष्ट्यात बर्गर, पॅटीस खाऊ नका. ऑयली पदार्थांचे सेवन करु नका.
फळांचा ज्यूस
फळांचा ज्यूस पिऊ नका. यामध्ये शुगरचे प्रमाण खुप जास्त असते. यामुळे सकाळी फक्त फळे खावीत. ब्रेकफास्टमध्ये आंबट फळांचे सेवन करु नये.
बिस्कीट, कुकीज
नाष्ट्यामध्ये बिस्कीट किंवा कुकीज अजिबात खावू नका. यामुळे फॅट वाढते आणि चयापचय क्रियाही बिघडते. यामुळे वजनही वाढते. याऐवजी अंड्याचा सफेद भाग सेवन करा.
कॉफी
सकाळी कॉफी प्यायल्याने भुख कमी होते. कोल्ड कॉफी हॉट कॉफीपेक्षा जास्त नुकसानदायक आहे.