आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दुधामध्ये मोठ्याप्रमाणात गुणधर्म असून नियमित दुध पिणे आरोग्यासाठी चांगले असते. दुध हे साक्षात पृथ्वीवरील अमृत आहे. तसेच ते सर्वोत्तम पेय असून सर्वश्रेष्ठ आहारासह मौल्यवान औषधही आहे. मनुष्याची शारीरिक, मानसिक तसेच अध्यात्मिक शक्ती वाढवणारा दुधासारखा दुसरा आहार नाही. हेच दूध जर चूकीच्या पद्धतीने प्यायल्यास ते नुकसानकारक तसेच कोणताही लाभ न देणारे ठरू शकते. यासाठी दूधाचा वापर करावा याची योग्य माहिती जाणून घेवूयात.
आंबट व खारट पदार्थ तसेच मांसाहारी जेवणाबरोबर दुधाचे सेवन करू नये. यामुळे असंख्य रोग उद्भवतात. जेवण आणि दुग्धपान यात कमीतकमी दोन तासांचे अंतर ठेवावे. उडदाच्या डाळीसोबत दुधाचे सेवन करू नये. कारण हे आरोग्यासाठी चांगले नाही. दूध जास्त जास्त वेळ तसेच तीव्र आचेवर गरम केल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते.
फिके दुध पिणे अधिक लाभदायक असते. दुधात साखर मिसळल्याने शरीरातील कॅल्शिआमचे प्रमाण कमी होते आणि कफाचे प्रमाण वाढते. दुधात गूळ मिसळून कधीही पिऊ नये, यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. दमा, जुलाब, मुरडा, पोटदुखी, अपचन, नवा ताप, त्वचाविकार इत्यादी व्याधींमध्ये दुध पिऊ नये.