आरोग्यनामा टीम – कडुलिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. उन्हाळ्यात होणाऱ्या स्किन अॅलर्जी, खाज, रॅशेज अशा अनेक समस्या यामुळं दूर होतात. आज आपण कडुलिंबाचे फायदे जाणून घेणार आहोत.
– जर तुम्हाला टॅनिंगची समस्या असेल तर कडुलिंबाची पानं उकळून थंड करा. या पाण्यानं चेहरा धुतला तर टॅनिंग दूर होते. यामुळं स्किन टोन लाईट होण्यास मदत होते.
– जर तुम्हाला प्रदूषण किंवा धुळीमुळं स्किन इंफेक्शन झालं असेल, रॅशेज आले असतील तर अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पानं टाका. वापर करण्याआधी ही पानं स्वच्छ धुवून घ्या.
– सतत खाज येत असेल तर कडुलिंबाची पानं दह्यासोबत वाटून त्या जागेवर लावा. यामुळं लगेच आराम मिळेल.
– जखम झाली असल्यास कडुलिंबाच्या पानांचा लेप जर लावला तर फायदा मिळतो. यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि कडुलिंबाच्या पानाची पेस्ट तयार करा.
– जर मलेरिया झाला असेल तर कडुलिंबाच्या झाडाची साल पाण्यात उकळून त्याचा काढा तयार करा. हा काढा पिला तर फायदा मिळतो.
– कडुलिंबाच्या तेलात थोडासा कापूर एकत्र करून शरीरावर मसाज केली तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
– कडुलिंबाच्या खोडात, खोकला, बद्धकोष्टता आणि पोटाच्या समस्या दूर करणारे गुणधर्म असतात.
– डोकेदुखी, दातदुखी, हातपायांना वेदना होणं, छातीत वेदना होणं अशा समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाची मदत होते.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ टाळावेत.