आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेली जीवनशैली, स्पर्धा, सततचा अभ्यास, संगणक, मोबाईलचा जास्त वापर, यामुळे चष्मा लवकर लागतो. आपल्याला चष्मा लागला आहे का, हे अनेकांना लवकर कळत नाही. यासाठी डोळे तपासणे आवश्यक असते. परंतु, काही संकेतावरून चष्मा लागू शकतो की नाही, हे समजू शकते.
हे आहेत संकेत
डोकेदुखी
विनाकारण सतत डोकेदुखी, डोळ्यांच्या आजूबाजूला वेदना होणे.
लाल डोळे
विनाकारण डोळे लाल होणे. डोळ्यांमध्ये जळजळ आणि खाज येणे.
पापण्या मिचकावणे
डोळे कोरडे झाल्याने वारंवार पापण्या मिचकावाव्या लागणे.
अंधारातून उजेडात जाताना त्रास
अंधारातून प्रकाशात जाताना त्रास होणे, रात्री गाडी चालवताना अडचण येणे.
डोळ्यांच्या वेदना
थोडा वेळा वाचन केल्यावर डोळे दुखणे, जळजळ होणे आणि थकवा येणे.
धूसर दिसणे
दूरचे किंवा एकदम जवळच्या वस्तू धूसर दिसणे. वाचन करताना अडचण येणे.
रात्री त्रास
रात्री किंवा पहाटे-पहाटे वस्तू व्यवस्थित न दिसणे.
संगणक
संगणकांवर काम करताना त्रास होणे. शब्द अंधुक दिसणे. डोळे आणि डोके दुखणे.
डोके गरगरणे
एखादी वस्तू सतत पाहताना त्रास होणे. दृष्टी स्थिर करताना डोके गरगरणे किंवा अस्वस्थ वाटणे.
डबल दिसणे
एखादी वस्तू किंवा गोष्ट आपल्याला डबल दिसत असेल तर या प्रकाराकडे दुर्लक्ष करू नका.