आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याकडे माणसांसाठी मोठ्या प्रमाणात रक्तपेढ्या उपलब्ध आहेत. मात्र, प्राण्यांना रक्ताची गरज लागल्यास रक्त उपलब्ध होत नाही. भारतात प्राण्यांसाठी फार क्वचितच ब्लड बँक उपल्बध आहेत. चेन्नईमध्ये तामिळनाडू वेटेरीनारी अँड अॅनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटीची रक्तपेढी आहे. ओडिशामध्ये देखील एका रक्तपेढीचे काम सुरू आहे. लवकरच हैदराबादमध्ये सुद्धा प्राण्यांसाठी रक्तपेढी सुरू होणार आहे.
धक्कादायक म्हणजे अनेकदा रक्त दिल्याने पाळीव प्राणी बरा होईल. हे पशुवैद्यक प्राण्याच्या मालकांपासून लपवतात. काहीवेळा प्राण्यांच्या मालकांना प्राण्यांचा रक्तगटही माहिती नसतो. प्राण्यांच्या रक्तदानानंतरच्या प्रक्रियेसाठी पुण्यात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी सुविधा निर्माण झाल्यास पाळीव कुत्रे आणि मांजरींवर उपचार करण्यात अडचण येणार नाही. माणसांसाठी रक्तदान व्हावे यासाठी जनजागृती केली जाते. पण, प्राण्यांच्या बाबतीत तसा विचारही करताना फारसे कुणी आढळत नाही. प्राण्यांना रक्ताची गरज कमी असली तरी त्याबाबत जनजागृती गरजेची आहे. जेणेकरून प्राण्यांनाही गरज लागल्यास रक्त उपलब्ध होऊ शकते.