आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सतत सर्दी आणि खोकला होण्याची अनेकांना समस्या असते. यावर वेगवेगळे उपाय करूनही पुन्हा त्रास होतो. अशावेळी काही घरगुती औषधे लाभदायक ठरतात. हे घरगुती उपाय कोणते ते जाणून घेवूयात.
करा हे घरगुती उपाय
१ या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या. तुळशीची पानेही यात टाकू शकता.
२ चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घ्या.
३ कान दुखत असेल तर घश्यात इन्फेक्शन असू शकते, यामुळे नंतर सर्दी खोकला होऊ शकतो. यासाठी काही लसणाच्या पाकळ्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा.
४ लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा.
५ लसणाच्या ४ पाकळ्या, २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घ्या.
६ लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता ७ ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या.
८ गवती चहा, आले, लवंग, काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा घ्या.
९ चार वेलची, काळामिरीचे दाणे, लवंगा, ताजे आले व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा. उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा. त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी थोडेसे मध घाला.
१० तुळशीची १०-१५ पाने दीड कप पाण्यात उकळा. दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
११ ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.
Visit : arogyanama.com