आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेहरा सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंट घेत असतात. यामध्ये काही रसायने असलेली कॉस्मेटीक वापरली गेल्याने त्वचेचे नुकसाने होऊ शकते. साइड इफेक्ट होण्याची शक्यता असते. यापेक्षा वॉटर थेरपी केल्यास त्वचा उजळते आणि फ्रेश राहते. उन्हाळ्यात महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही प्रयोग केल्यामुळे चेहरा खराब होतो, तर काहींना उन्हाचा त्रास होत असतो. त्वचेसाठी वापरलेल्या प्रॉडक्ट्समुळे त्रास होतो यामुळे त्वचा काळवंडणे आणि डिहायड्रेशनची समस्या होते. यासाठी वॉटर थेरपी नैसर्गिक असल्याने यामध्ये कोणतीही जोखीम नसते.
आपण काही वॉटर थेरपींची माहिती येथे घेणार आहोत. यामध्ये हायड्रो थेरपी विषयी माहिती घेऊयात. या थेरपीमुळे स्नायू बळकट होतात. तसेच त्वचादेखील चांगली होते. त्याचबरोबर फुप्फुसे आणि हृदयसुद्धा निरोगी राहते. तणावाच्या वेळी शरीरातील ठोके वाढतात. यामुळे रोज योग्यप्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील एनर्जीची पातळी वाढून त्वचा फ्रेश दिसते. दुसरी आहे हायड्रो स्टॅटिक इफेक्ट. पाण्यात व्यायाम शरीरासाठी चांगले आहे. यामुळे तणाव नाहीसा होतो. शरीरातील तापमान वाढते आणि त्यामुळे जास्त घाम येत नाही. याव्यतिरिक्त पाण्यातील हायड्रो स्टॅटिक इफेक्टमुळे मसाज केल्यासारखे वाटते. याशिवाय आणखी काही वॉटर पाण्याशी संबंधीत उपाय आहेत. त्याचीही आपण माहिती घेणार आहोत. मॉडर्न डिटॉक्सिफिकेशन मुळे त्वचा ग्लो करते. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. अतिरिक्त ऑइल पण स्वच्छ होते.
तसेच सुपर हायड्रेटर ही प्रक्रियाही खुप महत्वाची आहे. कोरड्या त्वचेला मॉइश्चराइज करण्यासाठी या दिवसांत सुपर हायड्रेटचा वापर केला जातो. पाण्याने चेहऱ्यावर दबाव टाकून त्वचेला पाणी देण्यात येते. तीन ते चार सेटिंगने त्वचा सॉफ्ट होते. अॅक्वा रेडियन ही प्रक्रिया वाढत्या वयात तणावाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जेट स्प्रेच्या साहाय्याने सुपर हायस्पीडपासून हिचा उपयोग केला जातो. ही एक तासाची प्रोसेस असून ती महिला मोठ्याप्रमाणात घेताना दिसतात. स्टिम सोना बाथ ही सुद्धा अशीच एक उत्कृष्ट प्रक्रिया आहे. तणावामुळे अस्वस्थता वाटत असल्यास हॉट शॉवर आणि सोनामध्ये चांगली बाथ घेऊ शकता. यामुळे तणाव दूर होतो आणि कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो. तसेच फिटनेससाठी, वजन कमी करण्यासाठी बाजारातील काही औषधांचा केला जातो. अनेक जण जीममध्ये जातात. मात्र, औषधांचे सेवन करण्यापेक्षा जिमसोबत नैसर्गिक ज्यूसचे सेवन केल्यास वजन कमी होते. नारळ पाणीमध्ये इतर फळांच्या तुलनेने जास्त इलेक्ट्रॉलाइट्स आणि अतिरिक्त शुगरसह कोणतेही कृत्रिम फ्लेवर व अजिबात कॅलरी नसल्याने जाडी वाढत नाही. याव्यतिरिक्त हे शरीरात लगेच स्फूर्ती करते. म्हणून नारळ पाणी नेहमी घ्यावे. संत्र्याचा रस वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी असते. ते शरीरासाठी चांगले असते. शिवाय चरबीदेखील कमी करते. अॅपल व्हिनेगर हे चवीला फारसे चांगले नसले तरी वजन कमी करण्यासाठी त्याचा खुप चांगला उपयोग होतो. अॅपल व्हिनेगर ज्यूस दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावा. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते.
व्हेजिटेबल ज्यूस घेतल्याने शरीराला अनेक फायदे होतात. ताज्या भाज्यांचे रस शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. शरीराला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे यातून मिळतात. शिवाय भाज्यांच्या ज्यूसने वजनही कमी होते. व्हेजिटेबल ज्यूसमध्ये तंतू अधिक प्रमाणात असल्याने भूक लवकर लागत नाही. जेवणाच्या २० मिनिटे आधी हा ज्यूस घेतल्यास कमी जेवणातच पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे योग्यप्रमाणातच अन्न पोटात जाते. तसेच ग्रीन टी प्यायल्याने ३५-४३ फॅट कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी दिवसातून ३ ते ५ कप ग्रीन टी प्यावी. ग्रीन टीमध्य फक्त गरम पाण्यात मिसळून टी बॅग टाकून पिण्यात येते. अॅलोवेरा थेरपीमध्ये त्वचा ग्लो करण्यासाठी पाणी आणि कोरफडीला मिसळून मसाज करावा. यानंतर गॅल्वेनिक मशीनने दोन मिनिटांपर्यंत मसाज केल्यास त्वचा मुलायम होते