आरोग्यानामा ऑनलाइन टीम – अनेक त्वचाविकार कडूलिंबामुळे बरे होऊ शकतात. यातील निम्बिडोल आणि गेड्युनिन, या अॅन्टीफंगल घटकांमुळे इन्फेक्शन दूर होते. पायाच्या तळव्यांना घाम येत असल्याने बुट, चप्पलला दुर्गंधी येते. फंगल इंन्फेक्शनमुळेच ही समस्या होते. अनेकदा पायावर लाल चट्टेही येतात. या इंफेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंबाचा वापर केल्यास फायदा होऊ शकतो. कडुलिंबाचा वापर कोणत्या पद्धतीने करता येतो ते जाणून घेवूयात.
1 तेल
इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब लावावेत. फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा हा प्रयोग करावा. यामुळे नखांवरील इंफेक्शनदेखील दूर होते.
2 पाने
कडूलिंबाची पाने स्वच्छ धुवून त्याची पातळ पेस्ट करावी. यामध्ये लिंबाचा रस व चिमूटभर हळद मिसळावी. तयार पेस्ट त्वचेवर 20-30 मिनिटे लावून सुकू द्या. नंतर पाण्याने पाय स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित दिवसातून दोनदा केल्यास फंगल इन्फेक्शन दूर होते.
फंगल इंफेक्शन
कडूलिंबाचे तेल फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी वापरले जाते. कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावली तरी इन्फेक्शन कमी होते.