‘फिगर’ मेंटेन करायची आहे का ? मग करा ‘हा’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी महिला परफेक्ट फिगर मेंटेन करतात. धावपळीच्या जीवनात फास्टफूडचे प्रमाण वाढल्याने शरीर लवकर बेडौल होते. अनियमीत झोप आणि फास्टफूड हे यामागील प्रमुख कारण आहे. फिगर मेंटेन करण्यासाठी महिलांनी  ‘गरूडासन’  हे आसन केल्यास लवकर फरक दिसून येतो.

असे करा गरूडासन

गरूडासन करण्यासाठी प्रथम ताठ उभे राहावे. नंतर डावा पाय समोर उचलावा. डाव्या पायाचा उजव्या पायाभोवती वेढा घालावा. या प्रकारे दोन्ही हात समोर उचलून नमस्कार करण्याच्या मुद्रेत जोडवेत. दोन्ही हाताचा व पायाचा वापर करून ही क्रिया वारंवार करावी. कमीत-कमी पाच वेळा गरूडासनची क्रिया करावी.

हे लाभ होतील

हे आसन नियमीत केल्यानंतर मांसपेशी मजबुत होतात. गुढघे आणि कंबर दुखीचा त्रास होत नाही. शरीर थरथरत असेल तर हे आसन प्रभावी आहे. यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तसेच मूत्राशयाचे आजार होत नाहीत.