आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कमी झोप, फास्टफूडचे सेवन, अनियमित आणि चूकीचा आहार यामुळे लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणामुळे विशेषता महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, शरीराचा बांधा बेडौल झाल्याने मानसिकदृष्ट्याही त्यांच्यावर परिणाम होतो. आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी महिलांनी गरूडासन केले तर त्या फिगर मेंटेन करू शकतात.
हे आसन करा
हे करताना करण्यासाठी प्रथम ताठ उभे राहा. नंतर डावा पाय समोर उचला. नंतर डाव्या पायाचा उजव्या पायाभोवती वेढा घाला. दोन्ही हात समोर उचलून नमस्कार करण्याच्या मुद्रेत जोडून घ्या. हाताचा व पायाचा वापर करून ही क्रिया वारंवार करा. कमीत-कमी पाच वेळा हे आसन करा.
हे आहेत फायदे
हे आसन नियमित केल्याने मांसपेशी मजबुत होतात. गुढगे आणि कंबरेचा त्रास होत नाही. शरीर थरथरत असेल तर चांगला गुण येतो. लठ्ठपणा कमी होतो. मूत्राशयाचे आजार होत नाहीत.