अॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कामाचा ताण, धावपळ, अयोग्य आहार, व्यायामाचा आहार यामुळे अलिकडे अॅसिडीटी, गॅस, बद्धकोष्ठची समस्या वाढत चालली आहे. अॅसिडीटीमुळे पोट दुखी, डोके दुखी, गुडखेदुखी सारखे आजार होतात. त्यामुळे जास्त दिवस अॅसिडीटी राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी लवकर उपाय करणे चांगले असते. अशा समस्येमुळे व्यक्तीचे कामात सुद्धा लक्ष लागत नाही. ही समस्या दूर करायची असल्यास एक नैसर्गिक उपाय असून त्याबाबत आपण जाणून घेवूयात.
हस्तमुद्रा करा
अॅसिडीटीची समस्या मुळापासून संपवण्यासाठी हस्तमुद्रा आणि योगा रामबाण उपाय आहे. दररोज फक्त पाच मिनिटे हस्तमुद्रा केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कायमचे दूर होते. यासाठी नियमित हस्तमुद्रा करावी.
अशी करा वायु मुद्रा
वायु मुद्रा करण्यासाठी प्रथम तर्जनीला वाकवावी, तर्जनीच्या नखावर आंगठा ठेवून आंगठ्याने तर्जनीवर दबाव द्यावा. दोन बोटे अशा स्थितीत ठेवल्यानंतर उरलेली तिन्ही बोटे हावेत सरळ ठेवावीत. आता जी मुद्रा तयार होते तिला वायु मुद्रा असे म्हणतात. रोज दहा मिनिटे ही वायु मुद्रा करावी. याचबरोबर प्राण मुद्राही करावी.
हे होतात फायदे
अॅसिडीटी, गॅस, वात कायमचा दूर होतो.
अर्धांगवायू, लकवा, हिस्टीरिया, सारखे असाध्य रोगही बरे होतात.