आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळीत अनेक महिलांना त्रास होतो. पोटदुखीने त्या त्रस्त होतात. यावर काहीजणी पेनकिलर अथवा काही औषधे घेतात. यामुळे वेदना कमी झाल्या तरी हा तात्पुरता उपाय असतो. कधीकधी अशा औषधांचे साईड इफेक्ट्स सुद्धा होतात. या काळातील त्रास दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१) पोटावर लेव्हेंडर ऑईल लावून मसाज केल्यास पोटदुखी आणि स्नायुंवरील ताण कमी होतो.
२) शक्य तेवढे प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा.
३) कोरफडीच्या रसामध्ये थोडे मध मिक्स करून घ्या. यामुळे रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो. वेदना कमी होतात.
४) दूध आणि दूधाच्या पदार्थांचा समावेश करा. वेदना कमी होतात.
५) आंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. गरम पाण्याच्या पिशवीने पोट आणि पाठ शेकवा.
६) मांसाहार कमी करा. कॅफेनयुक्त पदार्थ अथवा पेय घेणे टाळा.
७) आहारात रताळे आणि ग्रीन टीचा समावेश करा. दुखणे कमी होते.