आरोग्यनामा ऑनलाइन टीम – किडनी स्टोनच्या वेदना असह्य असतात. पोटात आणि पाठीमागच्या बाजूला होत असलेल्या या वेदना सहन करणे त्रासदायक ठरतात. सतत लघवीला जाणे, शौचाला त्रास होणे, जास्त घाम येणे आणि उलटी होणे, असाही त्रास होतो. किडनी स्टोनवर काही औषधेसुद्धा उपलब्ध असून ऑपरेशन करुनही तो काढला जातो. काही घरगुती उपाय केल्यास या समस्येतून आराम मिळू शकतो. हे घरगुती उपाय जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१. व्हीट ग्रास
व्हीट ग्रास पाण्यात उकळून थंड करून ते पाणी नियमित सेवन करावे. यात थोडा लिंबाचा रस मिसळल्यास आणखी फायदा होतो.
२. राजमा
राजमा किडनी आणि ब्लेडरच्या आजारांवर फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवाल ते पाणी प्यायल्यानेही फायदा होतो.
३. कलिंगड
किडनी स्टोनवर कलिंगड खुपच उपयुक्त आहे. यातील पोटॅशिअममुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर जाऊ शकतो.
४. लिंबू रस आणि ऑलिव्ह ऑइल
समप्रमाणात लिंबू रस आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण गॉलब्लेडरच्या स्टोन व किडनी स्टोनवरही फायदेशीर आहे. यामध्ये स्टोनला तोडण्याची क्षमता असते. पुन्हा स्टोन तयार होत नाही. दिवसातून तीन वेळा हे मिश्रण सेवन करा.
५ डाळिंब
किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावे अथवा रस घ्यावा. हे फ्रूट सॅलडमधूनही खाऊ शकता.