आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांना अचानक अंगाला खाज येते. आणि ही खाज अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. आपण जितके जास्त खाजवतो. तितकी खाज जास्त येते. आणि अतिप्रमाणात खाजवल तर आपल्या त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता जास्त असते. या अतिशय त्रासदायक असणाऱ्या आजारापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच हे काही नैसर्गिक उपाय करून पहा. जाणून घ्या खाज कमी करण्याचे नैसर्गिक उपाय.
१) तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपड बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा.
२) कोरफडीतील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.
३) लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्यामुळे त्वचेच्या ज्या भागावर खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्यावरच हे थेंब सुकू द्या. यामुळे तुमच्या अंगांची खाज कमी होईल.
४) पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते. खाज कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.
५) खाज येत असलेल्या ठिकाणी खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.