आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संधिवात हा एखाद्या विशिष्ट वयात होणार आजार नाही. हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. कारण हा आजार जरी सामान्य वाटत असला तरी खूप वेदनादायी आहे. काहींच्या हाडांत जन्मजात विकृती असते. सूज, दाह, जंतूंचा प्रादूर्भाव झाल्याने अपघातामुळे हाडांना मार लागण्यामुळे किंवा तुटणे सरकण्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांनी हाडांना पोचणाऱ्या इजेमुळे, वयोमानानुसार मणक्यांची, हाडांची होणारी झीज, शिवाय हाडे ठिसूळ होण्यामुळे या आणि अशा अनेक कारणांमुळे संधिवात होत असतो. या आजरावर आपण काही घरगुती उपचारही करू शकतो.
या आजारांवर घरगुती उपाय खालीलप्रमाणे :
१) संधिवातामुळे होणाऱ्या वेदना टाळण्यासाठी गरम आणि थंड थेरपीची मदत घ्या. अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर करा. झोपण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करा. कारण यामुळे ऊब मिळते. या दुखण्यावर थंड उपचारही एक चांगली थेरपी आहे. यात बर्फाचा वापर करावा. वेदनापासून सुटका मिळण्यासाठी ही थेरपी चांगली आहे. सांधे दुखत असतील तर टॉवेलमध्ये बर्फ घेऊन त्याचा शेक घ्यावा.
२) ध्यान धारणा करणे हे तर कोणत्याही आजारावर उपयुक्त आहेच. पण संधिवातासाठी पण ध्यान धारणा खूप महत्वाची आहे. कारण यामुळे तणावातून सुटका होते. तसेच विश्रांती मिळते. यातून आपण संधिवातावर नियंत्रण मिळवू शकतो.
३) भारतीय जेवणामध्ये सामान्यत: पिवळा मसाल्याला महत्व आहे. अर्थात हळद. संधिवात वेदना कमी करण्यासाठी हळद सक्षम आहे. त्यात एक रासायनिक क्युरक्यूमिन समाविष्टीत आहे. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
४) संधिवाताच्या दुखण्यासाठी मालिश करणे कधीही चांगले. संधीवातामुळे सांध्यांचा भाग कडक होतो. किंवा सुजतो. ही सुज कमी करण्यासाठी मालिश करणे एक चांगला उपाय आहे.
५) दोन-तीन लसणीच्या पाकळ्या तुपावर किंवा एरंडेलावर परतून दिवसातून एकदा, असे २-३ महिने खाव्यात. रोज रात्री झोपताना सुंठीच्या काढ्याबरोबर एरंडेल आपल्या कोठ्यानुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेणे.