आरोग्यनामा ऑनलाईन- सोरायसिस हा त्वचा रोग आहे. हा सहसा कोरड्या वातावरणात म्हणजेच हिवाळ्यामध्ये उद्भवतो. यात त्वचेवर लाल आणि पांढरे डाग दिसू लागतात. कवच सारखी त्वचा खाली(natural methods ) उतरण्यास सुरूवात होते. जळजळ, खाज सुटणे आणि वेदना जाणवू लागते. जर आपणही या समस्येमुळे(natural methods ) त्रस्त असाल तर आराम मिळवण्यासाठी जाणून घ्या काही देशी उपाय
१)कोरफड जेल
कोरफड जेल औषधी आणि अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे, त्वचेसाठी खूप प्रभावी आहे. १ चमचा कोरफड जेलमध्ये लव्हेंडर तेलाचे काही थेंब मिसळून प्रभावित भागाची मालिश केल्याने सोरायसिसपासून आराम मिळतो. तसेच, त्वचेवर खोल पोषण होते. कोरडी त्वचा, जळजळ, खाज सुटणे आणि लालसरपणापासून आराम मिळतो.
२)सफरचंद व्हिनेगर
यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, हे आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. सोरायसिसमुळे त्वचेची जळजळ, खाज सुटणे, वेदना होणे आणि लाल पुरळ येते. सफरचंद व्हिनेगरमुळे या समस्या पासून आराम मिळू शकतो. ते वापरण्यासाठी एका भांड्यात १/२ कप पाणी आणि २ चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळून घ्यावे. नंतर कापसाच्या मदतीने हलक्या हाताने १५ मिनिटांसाठी मालिश करून नंतर ते कोमट पाण्याने स्वच्छ करावे. आठवड्यातून २ वेळा हे मिश्रण लावल्यास फरक पडेल. फाटलेल्या आणि कापलेल्या त्वचेवर लावण्यास टाळा.
३)गुलाब पाणी आणि हळद
१ चमचा गुलाब पाण्यात एक चिमूटभर हळद मिसळा आणि प्रभावित भागावर लावा. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. अँटी-बॅक्टेरिया, अँटी-व्हायरल, अँटी-सेप्टिक गुणधर्मांसह हळद त्वचा निखळ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. दिवसातून २ वेळा ही मिश्रण लावल्यास फायदा होईल.
४)खोबरेल तेल
नारळ तेलात जीवनसत्व, लोह, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल इत्यादी गुणधर्म असतात. खोबरेल तेल हलके गरम करून त्वचेची मालिश केल्यास डाग, चिडचिडेपणा, खाज सुटणे इत्यादीपासून आराम मिळतो. त्वचेत ओलावा टिकून राहतो. त्वचा तरुण दिसते. रात्री झोपेच्या आधी लावल्यास जास्त फायदा होतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.